नवी दिल्ली, 18 जून : दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागी भारताचा सलामीवीर आणि आयपीएलमधील पंजाब किंग्जचा कर्णधार मयांक अग्रवालला इंग्लंड दौऱ्यावर संधी दिली जाऊ शकते. मयांक 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे राहुल इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला असून उपचारासाठी त्याला जर्मनीला जावे लागणार आहे. केएल राहुल भारतीय कसोटीचा उपकर्णधार असल्याने त्याच्या जागी ऋषभ पंतला उपकर्णधार बनवले जाऊ शकते. पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. रविवारी (19 जून) शेवटच्या टी-20 सामन्यानंतर पंत सहकारी खेळाडूंसोबत इंग्लंडला रवाना होणार आहे.
इनसाइडस्पोर्टने बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मयांकला इंग्लंड दौऱ्यासाठी स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही संघ व्यवस्थापनाला विचारले आहे की, त्यांना केएल राहुलच्या बदलीची गरज आहे का. 19 तारखेपर्यंत उत्तर मिळेल. त्यामुळे मयांक दुसऱ्या तुकडीसोबत इंग्लंडला जाणार आहे. मात्र, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. ऋषभ पंत उपकर्णधार असण्याची शक्यता आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप पंत आणि मयांक यांच्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सांगितलेली नाही.
भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक:
24-27 जून: लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब, चार दिवसीय सराव सामना
1 जुलै: भारत अ विरुद्ध डर्बीशायर, T20I सामना
1-5 जुलै: भारत विरुद्ध इंग्लंड, 5 वी कसोटी, बर्मिंगहॅम
3 जुलै: भारत अ विरुद्ध नॉर्थम्प्टनशायर
हे वाचा -
विराट-बाबर आता एकाच टीमकडून खेळणार! प्रत्येक वर्षी होणार सीरिज
भारत-इंग्लंड T20 मालिका -
पहिला सामना - 7 जुलै, साउथॅम्प्टन
दुसरा सामना – 9 जुलै, बर्मिंगहॅम
तिसरा सामना – 10 जुलै, नॉटिंगहॅम
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका
पहिला सामना - 12 जुलै, केनिंग्टन ओव्हल
दुसरा सामना - 14 जुलै, लॉर्ड्स
तिसरा सामना – 17 जुलै, मँचेस्टर
हे वाचा -
IND vs SA : ऋषभ पंतचं T20 टीममधलं स्थान पक्कं नाही, दोन खेळाडू करणार गेम ओव्हर!
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
स्टँड बाय प्लेअर: मयंक अग्रवाल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.