मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : एलिमिनेटरच्या पराभवानंतर KL Rahul ला खुन्नस, Gautam Gambhir ची पहिली प्रतिक्रिया

IPL 2022 : एलिमिनेटरच्या पराभवानंतर KL Rahul ला खुन्नस, Gautam Gambhir ची पहिली प्रतिक्रिया

आयपीएल 2022 च्या एलिमिनेटरमध्ये (IPL 2022 Eliminator) आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सचा (RCB vs LSG) 14 रननी पराभव केला. या पराभवानंतर लखनऊचा मेंटर असलेल्या गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) केएल राहुलला (KL Rahul) खुन्नस देतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या एलिमिनेटरमध्ये (IPL 2022 Eliminator) आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सचा (RCB vs LSG) 14 रननी पराभव केला. या पराभवासोबतच लखनऊचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं, तसंच त्यांचं आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. आरसीबीने दिलेल्या आरसीबीने दिलेल्या 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 ओव्हरमध्ये 193/6 पर्यंत मजल मारता आली, त्यामुळे त्यांचा 14 रननी पराभव झाला.

केएल राहुल (KL Rahul) लखनऊचा सर्वाधिक रन स्कोअर करणारा खेळाडू असला तरी आता त्याच्यावरच टीमच्या पराभवाचं खापर फुटत आहे. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलने एकट्यानेच 10 ओव्हर खेळल्या. 58 बॉलमध्ये राहुलने 79 रनची खेळी केली, यात 3 फोर आणि 5 सिक्सचा समावेश आहे. राहुलने 136.21 च्या स्ट्राईक रेटने केलेल्या बॅटिंगवर निशाणा साधण्यात येत आहे. राहुलने त्याचं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 43 बॉल खेळले.

IPL 2022 : लागोपाठ 5 मोसमात 600 रन करून फायदा काय? KL Rahul करतोय तीच चूक

आरसीबीविरुद्धची मॅच संपल्यानंतर लखनऊचा मेंटर असलेल्या गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या फोटोमध्ये गंभीर केएल राहुलकडे रागाने बघत आहे. केएल राहुलच्या संथ बॅटिंगने भडकलेल्या गंभीरने राहुलची शाळा घेतल्याच्या प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

आयपीएल 2022 मधलं लखनऊचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. नशिबाने आज साथ दिली नाही, पण आमच्या नव्या टीमसाठी स्पर्धा उत्कृष्ट होती. पुढच्या वेळी आम्ही आणखी जोरात पुनरागमन करू, असं गंभीर त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला आहे.

आरसीबी फायनलजवळ

लखनऊचा पराभव केल्यानंतर आता आरसीबीला राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळावा लागणार आहे. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होईल. या सामन्यात जिंकणारी टीम रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल फायनल खेळेल.

First published:

Tags: Gautam gambhir, Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants