मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 Elminator : पराभवानंतर भडकला Gautam Gambhir, KL Rahul ची घेतली शाळा, Look Viral

IPL 2022 Elminator : पराभवानंतर भडकला Gautam Gambhir, KL Rahul ची घेतली शाळा, Look Viral

एलिमिनेटरच्या (IPL Eliminator) सामन्यात आरसीबीने लखनऊला (RCB vs LSG) पराभवाचा धक्का दिला. लखनऊच्या या पराभवानंतर त्यांचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) खूपच नाराज दिसला. मॅच संपल्यानंतर गंभीर आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याचा एक फोटो समोर आला आहे

पुढे वाचा ...

मुंबई, 26 मे : आयपीएलमध्ये (IPL 2022) पहिल्यांदाच खेळणाऱ्या लखनऊ सुपर जाएंट्सने (Lucknow Super Giants) लीग स्टेजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावरच लखनऊ प्ले-ऑफमध्ये पोहोचली, पण एलिमिनेटरच्या (IPL Eliminator) सामन्यात आरसीबीने लखनऊला (RCB vs LSG) पराभवाचा धक्का दिला, त्यामुळे त्यांचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आरसीबीविरुद्ध 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 193 रन केले, ज्यामुळे त्यांचा 14 रननी पराभव झाला आहे. लखनऊच्या या पराभवानंतर त्यांचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) खूपच नाराज दिसला.

मॅच संपल्यानंतर गंभीर आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याचा एक फोटो समोर आला आहे, या फोटोमध्ये गंभीर राहुलकडे रागाने बघत असल्याचं दिसत आहे. आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलने 58 बॉलमध्ये 79 रनची खेळी केली, पण तरीही त्याला टीमचा पराभव टाळता आला नाही. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करतानाही राहुलने संथ बॅटिंग केली, ज्यामुळे लखनऊ विजयाच्या जवळ पोहोचली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही.

मॅच संपल्यानंतर गंभीर आणि केएल राहुल यांच्यात बरीच चर्चा झाली. गंभीर आणि राहुल नेमकं काय बोलत होते, ते कळू शकलं नाही, पण सोशल मीडियावर मात्र गंभीरने लखनऊचा कर्णधार केएल राहुलची शाळा घेतल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

लखनऊला या सामन्यात खराब फिल्डिंगचा फटकाही बसला. स्वत: कर्णधार राहुलने दिनेश कार्तिकचा कॅच सोडला. कार्तिकने या सामन्यात 23 बॉलमध्ये नाबाद 37 रनची खेळी केली, याशिवाय मॅचमध्ये शतक करणाऱ्या रजत पाटीदारचा कॅचही सुरूवातीला सोडण्यात आला होता. पाटीदार आणि कार्तिकला मिळालेल्या या जीवदानामुळे आरसीबीने 207 रनपर्यंत मजल मारली आणि लखनऊला हे आव्हान पार करणं कठीण गेलं.

First published:

Tags: Gautam gambhir, Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants, RCB