IPL आधी कोहलीला मोठा धक्का, RCBचे सर्व अकाउंट झाले बंद?

आरसीबीचे ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडल ब्लॉक झाले आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेय. कर्णधार विराट कोहलीनेही याबाबत ट्वीट करत आश्चर्य व्यक्त केले आहे.

आरसीबीचे ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडल ब्लॉक झाले आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेय. कर्णधार विराट कोहलीनेही याबाबत ट्वीट करत आश्चर्य व्यक्त केले आहे.

  • Share this:
    बंगळुरू, 13 जानेवारी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. टी-20 मालिकेत शानदार खेळी केल्यानंतर एकदिवसीय मालिकेत लाजीरवाणा पराभव भारताला सहन करावा लागला. आता 21 फेब्रुवारीपासून भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका होणार आहे. दरम्यान, या सगळ्यात कोहलीच्या आयपीएल टीमबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल मीडियावरून सर्व फोटो गायब झाले आहेत. आरसीबीच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून सर्व फोटो हटविण्यात आले आहेत. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले तर लेग स्पिनर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे सदस्य युजवेंद्र चहल यांनीही ट्वीट करून यामागचे कारण विचारले. दुसरीकडे आरसीबीचे ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडल ब्लॉक झाले आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कर्णधार विराट कोहलीनेही याबाबत ट्वीट करत आश्चर्य व्यक्त केले आहे. वाचा-हार्दिक पांड्या 6 महिन्यानंतर करणार कमबॅक! ‘या’ संघाविरद्ध उतरणार मैदानात वाचा-बूकी संजीव चावलाला उद्या भारतात आणणार, मॅच फिक्सिंगचा खुलासा होण्याची शक्यता आरसीबीचे नाव आणि लोगो बदलणार? रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) फ्रँचायझी येत्या आयपीएल हंगामापूर्वी आपले नाव आणि लोगो बदलू शकते, अशी बातमी प्रसारमाध्यमांतून येत आहे. असे म्हटले जात आहे की आरसीबी 16 फेब्रुवारी रोजी याबाबत मोठी घोषणा करू शकते आणि म्हणूनच त्याचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो हटविण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर ट्विटरवर फ्रेंचायझीने आपले नाव रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरहून रॉयल चॅलेंजर्स असे ठेवले. आता बंगळुरूच्या संघाचे नवे नाव काय आहे हे पाहावे लागेल, यासाठी आपल्याला 16 फेब्रुवारीपर्यंत थांबावे लागेल. वाचा-संघात मिळालं नाही स्थान, 23 वर्षीय खेळाडूने सोडलं क्रिकेट! वाचा-फलंदाज बोल्ड झाल्यानंतरही पंचांनी ठरवलं नाबाद! गोलंदाज म्हणाला, ऐकू आलं नाही का? आतापर्यंत एकदाही IPL जिंकला आला नाही आरसीबीने आतापर्यंत 12 हंगामात एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. 2009 आणि 2011 या दोन हंगामात आरसीबीचा संघ उपविजेतेपदावर राहिला. अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता. तर, 2020साठी बंगळुरूने काही महत्त्वाच्या खेळाडूंना त्याच्या संघाचा भाग बनवले आहे. ज्यात अ‍ॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, वरुण चक्रवर्ती, केन रिचर्डसन, जोश फिलिप यांचा समावेश आहे. RCBचा संघ- विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत पड्डीकल, पार्थिव पटेल, अरॉन फिंच, जोशुआ फिलिपी, शाहबाद अहमद, गुरकीरत मान, पवन देशपांडे, मोइन अली, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, इसरु उडाना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन आणि डेल स्टेन.
    First published: