• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • फलंदाज बोल्ड झाल्यानंतरही पंचांनी ठरवलं नाबाद! गोलंदाज म्हणाला, ऐकू आलं नाही का?

फलंदाज बोल्ड झाल्यानंतरही पंचांनी ठरवलं नाबाद! गोलंदाज म्हणाला, ऐकू आलं नाही का?

सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात मुंबईने पकड मिळवली होती पण आठव्या गड्यासाठी मकवाना आणि जडेजा यांनी सावध भागिदारी करत उरलेली षटके खेळून काढल्यानं मुंबईला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं.

 • Share this:
  मुंबई, 12 फेब्रुवारी : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा सौराष्ट्रविरुद्ध सामना अनिर्णित राहिला. यामुळे 2019-20 च्या हंगामात मुंबईचे आव्हान संपुष्टात आले. मुंबईने दुसऱ्या डावात सामन्यावर पकड मिळवली होती. सौराष्ट्रचे पहिले सात फलंदाज लवकर बाद झाले. मात्र, त्यानंतर आठव्या विकेटसाठी मोठी भागिदारी झाल्याने सौराष्ट्रचा पराभव टळला. यंदाच्या रणजी सिझनमध्ये मुंबईच्या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. कारण या सीझनमध्ये झालेल्या 7 पैकी केवळ एक सामना जिंकण्यात मुंबईला यश आले. तर 4 सामने अनिर्णित राहिले आणि 2 सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचे तोंड पाहावे लागले. नॉक आऊट सामन्यांआधीच मुंबईला रणजीतील गाशा गुंडाळावा लागला. दरम्यान, या सामन्यात एका चेंडूवर सौराष्ट्रचा मकवाना बोल्ड झाला पण त्याला पंचांनी नाबाद ठरवलं. स्टम्पला चेंडू लागल्यानंतर बेल्स न पडल्याने तो नाबाद ठरला. यावेळी चेंडू स्टम्पला लागताच आवाज झाल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. गोलंदाज रोस्टन डायसने तर ऐकू आलं नाही का असेही पंचांना विचारलं. मकवाना बाद झाला असता तर सामन्यात मुंबईने बाजी मारली असती. या जीवदानाचा फायदा घेत मकवानाने जडेजाच्या साथीने उरलेली षटके खेळून काढली. सौराष्ट्रविरुद्ध महत्त्वपूर्ण सामन्यात चौथा दिवस निर्णायक होता. सौराष्ट्रच्या संघाला गारद करून सामना जिंकत रणजीतील आव्हान कायम ठेवण्याची मुंबईला संधी होती. मात्र आठव्या विकेटसाठी झालेल्या पार्टनरशिपने सामन्याला कलाटणी मिळाली. तब्बल 40 ओव्हर्समध्ये मुंबईच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही आणि सामना अनिर्णित होण्याकडे झुकला. त्यासोबतच मुंबई रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेतून बाहेर पडणार, हेदेखील निश्चित झाले. मुंबई पहिला डाव - 262 सौराष्ट्र पहिला डाव - 335 मुंबई दुसरा डाव - 362/7 (घोषित) सौराष्ट्र दुसरा डाव- 158/7 (74.0) सरफराज खानची स्वप्नवत कामगिरी ज्या खेळाडूने आयपीएलमधून आपल्या खेळाने देशभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं त्या सरफराज खानने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये वादळ निर्माण केलं. मुंबईच्या रणजी टीमकडून खेळताना उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद 301 धावा, हिमाचल प्रदेशविरुद्ध नाबाद 226 धावा आणि त्यानंतर सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात 78 धावा. म्हणजेच तब्बल 605 धावा फटकावल्यानंतरच सरफराज खान बाद झाला. या कामगिरीने सरफराजने नवा इतिहास रचला आहे. स्टम्पचा माइक ठरला टीम इंडियासाठी व्हिलन, फलंदाजाला मिळालं जीवदान
  Published by:Suraj Yadav
  First published: