हार्दिक पांड्या 6 महिन्यानंतर करणार कमबॅक! ‘या’ संघाविरद्ध उतरणार मैदानात

भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे गेले 6 महिने क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी हार्दिकच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे गेले 6 महिने क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी हार्दिकच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर हार्दिकला कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही. आता पांड्या फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं लवकरच पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करताना दिसेल.

वाचा-बूकी संजीव चावलाला उद्या भारतात आणणार, मॅच फिक्सिंगचा खुलासा होण्याची शक्यता

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी घरेलु सामने खेळणार आहे. त्यामुळं पांड्या मुंबईत होणाऱ्या डीवाय पाटील टी-20 लीगमध्ये (DY Patil T20 Tournament) रिलायन्स संघाकडून खेळताना दिसेल. त्यामुळं आता हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी टी-20 लीग खेळणार आहे. डीवाय पाटील टी-20 लीगनंतर हार्दिक आयपीएल खेळताना दिसेल. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला 28 मार्च 2020पासून सुरुवात होणार आहे.

हार्दिक पांड्याचा कमबॅक भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T20 World Cup) दृष्टीने हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून महत्त्वाची भुमिका बजावताना दिसेल.

वाचा-संघात मिळालं नाही स्थान, 23 वर्षीय खेळाडूने सोडलं क्रिकेट!

6 महिने क्रिकेटपासून दूर आहे पांड्या

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी -20 सामन्यात 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला पाठीला दुखापत झाली होती. टी -20 वर्ल्ड कप लक्षात घेता बीसीसीआयने पंड्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठविले. शस्त्रक्रियेनंतर न्यूझीलंड दौऱ्यात त्याचा संघात समावेश होईल अशी अपेक्षा होती. असे झाले नसले तरी त्याची निवड न्यूझीलंडच्या भारत अ दौर्‍यासाठी झाली, परंतु वरिष्ठ संघात नाही. मात्र, नंतर मॅच फिटनेस नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर पांड्या पुन्हा एकदा लंडनला गेला आणि तेव्हापासून एनसीएमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली आहे. हार्दिक पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त झाला पाहिजे आणि लवकरच संघात परतला पाहिजे अशी भारतीय संघाची इच्छा आहे. या दौर्‍यावर न्यूझीलंडविरूद्ध संघात अष्टपैलू अभाव होता. टी -२० वर्ल्ड कपपूर्वी पंड्या तंदुरुस्त असावा आणि चांगल्या फॉर्ममध्ये संघात स्थान मिळावे अशी भारतीय संघाची इच्छा आहे.

वाचा-फलंदाज बोल्ड झाल्यानंतरही पंचांनी ठरवलं नाबाद! गोलंदाज म्हणाला, ऐकू आलं नाही का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 08:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading