नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणारा बूकी संजीव चावलाचे प्रत्यार्पण भारताकडे करण्यात आलं आहे. त्याला गुरुवारी लंडनवरून दिल्लीला आणलं जाणार आहे. संजीव चावलावर मॅच फिक्सिंग रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. हे फिक्सिंग प्रकरण दिल्ली पोलिसांनी 2000 मध्ये उघडकीस आणलं होतं. संजीव चावला दाऊद गँगसाठी 1990 च्या दशकात सट्टेबाज बनला. लंडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या संजीव चावलाला गुरुवारी भारतात आणलं जाईल. इंग्लंडसोबत 1992 मध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार भारतात आणला जाणारा संजीव हा दुसरा व्यक्ती असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चावला एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दिल्ली विमानतळावर पोहोचेल. त्याला दिल्लीचे पोलिस उपायुक्त राम गोपाल नाइक यांच्यासह पथकाने लंडनमधून ताब्यात घेण्यासाठी गेले आहेत. सध्या ते गृह मंत्रालयाच्या आदेशाची वाट बघत आहेत.
Delhi Police sources: Sanjeev Chawla, who was allegedly involved in a match-fixing racket that was busted by the Delhi Police in the year 2000, has been extradited from London and will arrive in Delhi tomorrow. pic.twitter.com/maVEFcqXgR
— ANI (@ANI) February 12, 2020
2000 मध्ये क्रिडा जगताला हादरवून टाकणाऱा मॅच फिक्सिंगचा प्रकार घडला होता. त्यावेळी दिल्ली पोलिस आयुक्त असलेल्या अजय राज शर्मा यांनी म्हटलं की, चावलाला 19 वर्षांनी भारतात आणलं जाणार आहे. त्याच्या चौकशीत क्रिकेट जगतातील अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. शर्मा यांच्या निरीक्षणाखाली या प्रकरणाची चौकशी झाली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. स्टम्पचा माइक ठरला टीम इंडियासाठी व्हिलन, फलंदाजाला मिळालं जीवदान