• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • संघात मिळालं नाही स्थान, 23 वर्षीय खेळाडूने सोडलं क्रिकेट!

संघात मिळालं नाही स्थान, 23 वर्षीय खेळाडूने सोडलं क्रिकेट!

ऑस्ट्रेलियाकडून 11 कसोटी सामने खेळलेल्या मॅट रेनश़ॉने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. रेनशॉला क्विन्सलँडने शेफील्ड शिल्डमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी संघात स्थान दिलं नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : प्रत्येक खेळाडूचं देशासाठी खेळण्याचं स्वप्न असतं. त्यात संधी मिळाली नाही तर अनेकदा त्यांना नाराजीचा सामना करावा लागतो. आतापर्यंत काही खेळाडूंनी संघातून डावलल्यानं खेळणं सोडल्याचे प्रकार समोर आले होते. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अंबाती रायडुची संघात निवड न झाल्याने त्यानं तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. आता ऑस्ट्रेलियाकडून 11 कसोटी सामने खेळलेल्या मॅट रेनश़ॉने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. रेनशॉला क्विन्सलँडने शेफील्ड शिल्डमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी संघात स्थान दिलं नाही. त्यानंतर रेनशॉने हा निर्णय घेतला. रेनशॉ सध्या 23 वर्षांचा असून बिग बॅश लीगच्या आधी 10 शेफिल्ड शिल्ड सामन्यात फक्त 182 धावा करू शकला होता. यात त्याला एकही अर्धशतक लगावता आलं नाही. तसेच 36 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. बीग बॅश लीगमध्ये रेनशॉने चांगली कामगिरी केली. त्यात त्यानं तीन अर्धशतकं केली. तसंच ब्रिस्बेन हिटकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. बिग बॅश लीग संपल्यानंतर रेनशॉने क्विन्सलॅंडच्या दुसऱ्या संघाकडून खेळले. तिथं त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध 26 धावांसाठी तब्बल 117 चेंडू घेतले. यानंतर संघात जो बर्न्स आणि मार्नस लॅब्युशेनने पुनरागमन केलं. त्यामुळे रेनशॉला संघाबाहेर बसावं लागलं. तसेच काही कौटुंबिक कारणांमुले रेनशॉने क्लब क्रिकेट खेळलं नाही. आता त्यानं काही काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. मॅट रेनशॉ गेल्या दीड वर्षापासून ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातून बाहेर आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये रेनशॉ य़ुएई दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात होता. तेव्हा क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू लागला होता. तरीही तंदुरुस्त असलेल्या मॅट रेनशॉला कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. स्टम्पचा माइक ठरला टीम इंडियासाठी व्हिलन, फलंदाजाला मिळालं जीवदान ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर झाल्यानंतरही त्याची कामगिरी खराब राहिली आहे. रेनशॉने 34 प्रथम श्रेणी सामने खेळताना 21.68 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात फक्त 2 अर्धशतकांचा समावेश आहे. संघातून बाहेर असलेल्या रोहित शर्माला चहल म्हणाला,'जळू नकोस'
  Published by:Suraj Yadav
  First published: