थाला इज बॅक! IPLआधी धोनीची 123 धावांच्या तुफानी खेळी, पाहा VIDEO

थाला इज बॅक! IPLआधी धोनीची 123 धावांच्या तुफानी खेळी, पाहा VIDEO

कोरोनामुळे आयपीएलच्या या हंगामावर टांगती तलवार असली तरी, चाहत्यांचे लक्ष आहे ते भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅककडे.

  • Share this:

चेन्नई, 13 मार्च : आयपीएल-2020 (IPL) या तेराव्या हंगामाची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनामुळे आयपीएलच्या या हंगामावर टांगती तलवार असली तरी, चाहत्यांचे लक्ष आहे ते भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅककडे. गेले आठ महिने क्रिकेटपासून दूर असलेला धोनी आयपीएलमध्ये कमबॅक करण्यास सज्ज आहे. त्यासाठी धोनी सध्या चेन्नईमध्ये सराव करत आहे.

गेले कित्येक महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीला पुन्हा एकदा फॉर्ममध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यासाठी धोनी सध्या चेन्नईच्या कॅम्पमध्ये सराव करत आहेत. यातच एका सराव सामन्यादरम्यान धोनीनं तुफानी फटकेबाजी करत आपला जून्या स्टाईलने गोलंदाजांची धुलाई केली.

वाचा-IPLमध्ये कोहलीच्या संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

धोनीची शतकी खेळी

आयपीएलआधी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी धोनी सध्या जोरात सराव करत आहे. सराव कॅम्प दरम्यान धोनीनं खेळलेल्या शतकी खेळीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी आक्रमक खेळी करताना दिसत आहे. या सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट झाला नसला तरी, या सामन्यात धोनीने 91 चेंडूत 123 धावा केल्या. या सामन्यात धोनीनं सुरेश रैनासोबत तुफानी फलंदाजी केली.

वाचा-कोरोनाची धास्ती! मोदी सरकारच्या प्रतिक्रियेनं IPL चा सस्पेन्स वाढला, काय होणार?

वाचा-भारत सरकारच्या एका निर्णयामुळे 60 खेळाडू IPL ला मुकणार, BCCI ला मोठा फटका?

गेले दोन सीझन धोनीसाठी ठरले उत्तम

गेल्या दोन आयपीएल हंगामात धोनीने जोरदार फलंदाजी केली. यामुळे, दोन्ही वेळा त्याच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. 2018 मध्ये, त्याच्या संघाने विजेतेपद जिंकले, तर मागील वर्षी 1 धावांनी पराभूत केले. आता आयपीएल 2020मध्ये धोनी आपल्या तुफानी फॉर्मच्या जोरावर आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2020 11:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading