नवी दिल्ली, 12 मार्च : कोरोना व्हायरसमुळे आता भारतातही भीतीचं वातवरण निर्माण झालं आहे. भारत सरकारने बुधवारी व्हीसा जारी करण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे बीसीसीआय़ला मोठा धक्का बसला आहे. यानुसार कोरोनाच्या संक्रमणाच्या धोक्यामुळे सरकारने व्हिसा बंदी घातली आहे. यानुसार 15 एप्रिलपर्यंत कोणत्याही परदेशी खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात येता येणार नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जे परदेशी खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी येतात त्यांना बिझनेस व्हिसा दिला जातो. सरकारच्या नव्या नियमांनुसार 15 एप्रिलपर्यंत कोणताही परदेशी खेळाडू भारतात येऊ शकणार नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या 60 परदेशी खेळाडूंना स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावं लागणार आहे. कोरोना व्हायरसमुळे भारत सरकारने देशात येणाऱ्या लोकांचे सर्व प्रकारचे व्हीसा रद्द केले आहेत. यातून डिप्लोमॅटीक व्हीसा, युएन/आंतरराष्ट्रीय संस्था, नोकरी, प्रोजेक्ट इत्यादीशी संबंधीत व्हिसाधारकांना सूट देण्यात आली आहे. हा निर्णय 13 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. देशातील कोरोना व्हायरसची परिस्थिती 15 एप्रिलपर्यंत आटोक्यात येईल असं मानलं जात आहे. त्यामुळे खेळाडूंना व्हिसा दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएळ 29 मार्च ते 24 मार्च या कालावधीत होणार आहे. अजुनही आयपीएल होण्याबाबत तसंच त्याच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलची 14 मार्चरोजी बैठक होणार आहे. हे वाचा : क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी! कोरोनामुळे आशिया आणि वर्ल्ड इलेव्हन टी-20 सामने यंदाच्या आयपीएलबाबत महत्वाचा निर्णय या बैठकीत होणार आहे. भारताता आतापर्यंत कोरोनाचे 60 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. जगभरात आतापर्यंत चार हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे वाचा : ‘कोरोना’मुळे IPL रद्द होणार? 48 तासांत सौरव गांगुली मोठा निर्णय घेण्याची शक्यता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







