सिडनी, 13 मार्च : जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना भारतातही याचा धोका वाढला आहे. कोरोनामुळं जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून काही देशांतील खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.
ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटने दिली आहे. यामुळे केन ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे.
केनला काही दिवसांपूर्वी खोकला आणि तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची तापसणी करण्यात आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले झाले आहे.
IPLवरही कोरोनाचं सावट
कोरोना व्हायरसमुळे IPL 2020 सुद्धा सध्या संकटात सापडलं आहे. कारण IPL 2020 ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर IPL रद्द केलं जाण्याची शक्यताही व्यक्त केलं जात आहे. कारण IPL वर बंदी घालण्यासाठी हायकोर्टात याचिका मद्रास कोर्टात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारीच IPL 2020 चे सामने पुढे ढकलण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टातसुद्धा याचिका दाखल करण्यात आली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया दौरा रद्द
कोरोनाव्हायरसमुळे भारत महिला संघाचा आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दौरा रद्द करण्यात आला आहे. तर, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यातील सामने हे प्रक्षेकांशिवाय खेळले जाणार आहे. याचबरोबर सध्या भारतात सुरू असलेला भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेसाठीही या निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आंतरराष्ट्रीय वन डे (एकदिवसीय) सामना रिकाम्या स्टेडियमवर खेळला जाईल. कोरोनाव्हायरसमुळे उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाच्या चालू सल्लागारानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सामन्यासाठी आतापर्यंत विकलेली सर्व तिकिटे परत केली जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, IPL 2020