नवी दिल्ली, 12 मार्च : इंडियन प्रीमीयर लीगला सुरुवात होण्यासाठी दोन आठवडे उरले असताना स्पर्धेच्या आय़ोजनावर कोरोनाचे संकट येण्याची शक्यता आहे. देशात कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने स्पर्धा आयोजित करण्याच्या बाजूने सरकार नसल्याचं म्हटलं आहे. देसात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सध्याचे सर्व व्हीसा 15 एप्रिलपर्यंत रद्द केले आहेत.
परराष्ट्र मंत्रालायाला आयपीएलच्या आयोजनाबाबत विचारलं असता सांगण्यात आलं की, आयपीएल स्पर्धा या परिस्थितीत खेळवायची की नाही याचा निर्णय सर्वस्वी आयोजकांचा आहे. आम्ही तर सध्या स्पर्धा आयोजित करू नये असाच सल्ला देऊ. पण आयोजकांनी स्पर्धा आयोजित करण्याचा ठरवलं तर तो त्यांचा निर्णय असेल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मोठ्या संख्येनं एकत्र येणं टाळा असं सांगितंल आहे. त्यामुळे आयपीएल रद्द न करता तो रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे.
देशातील कोरोना व्हायरसची परिस्थिती 15 एप्रिलपर्यंत आटोक्यात येईल असं मानलं जात आहे. त्यामुळे खेळाडूंना व्हिसा दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएळ 29 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत होणार आहे. अजुनही आयपीएल होण्याबाबत तसंच त्याच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलची 14 मार्च रोजी बैठक होणार आहे.
Say No to Panic, Say Yes to Precautions. No Minister of the Central Government will travel abroad in the upcoming days. I urge our countrymen to also avoid non-essential travel. We can break the chain of spread and ensure safety of all by avoiding large gatherings.
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2020
दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका पाहता बीसीसीआय़सह सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालायाने सांगितलं होतं की, स्पर्धेवेळी मोठ्या संख्येनं लोक एकत्र येऊ नयेत याची काळजी घ्या. देशात सामने सुरु राहतील पण प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाही अशी व्यवस्था करायला हवी.
हे वाचा : कोरोनाची लस घ्या, लाखो रुपये घेऊन जा; लसीच्या ह्युमन टेस्टसाठी ऑफर
भारतात आतापर्यंत 70 पेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. जगभरात यामुळे 4 हजार लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना व्हायरसमुळे नेमबाजी वर्ल्डकप आणि इंडिया ओपन गोल्फच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जाईल. याठिकाणी प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाही.
हे वाचा : सावधान! पुण्यात 'कोरोना'चे रुग्ण, तुम्हीही होऊ शकता शिकार; असा करा स्वत:चा बचाव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus, Cricket