स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020मध्ये शुभमन गील होणार KKRचा कर्णधार? शाहरुखनं केला खुलासा

IPL 2020मध्ये शुभमन गील होणार KKRचा कर्णधार? शाहरुखनं केला खुलासा

कार्तिकला डच्चू देऊन शुभमन गील होणार KKRचा कर्णधार?

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : आयपीएल 2020कडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरही चाहते या तेराव्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यात नवीन हंगामात संघात काही नवे बदल होऊ शकता. काही संघांचे कर्णधारही बदलले जाऊ शकते. दरम्यान सध्या शुभमन गीलचा फॉर्म बघता कोलकाता नाईट रायडर्स संघ त्याच्याकडे संघाचे नेतृत्व देणार का? हे पाहावे लागणार आहे. सध्या दिनेश कार्तिककडे KKR संघाचे नेतृत्व आहे. चाहत्यांनी कोलकाता कर्णधार कोण होणार? असा सवाल टीमचा मालक शाहरुख खानला विचारले, त्यावर त्यानं एक मजेदार उत्तर दिले.

सोशल मीडियावर चाहते नेहमीचा आपल्या आवडत्या कलाकारांना मजेशीर प्रश्न विचारत असतात. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खानला अशाच एक चाहत्यानं संघाबाबत एक प्रश्न विचारला. यावर शाहरुखनेही मजेदार पद्धतीने उत्तर दिले. ट्विटरवर एक युझरने #AskSrk ला, पुढच्या हंगामात KKR संघाचे कर्णधारपद शुभमन गीलकडे देणार का? असा सवाल विचारला. यावर किंग खान शाहरुख खाननं आपल्या मजेदार पद्धतीने या युझरला, ‘लवकरच तुला संघाचा हेड कोच करण्यात येईल’, असे उत्तर दिले.

वाचा-‘माझ्याकडे एवढा माल आहे की तुला...’, शोएब अख्तरची सेहवागवर खालच्या पातळीची टीका

वाचा-‘...म्हणून ऑस्ट्रेलियाचा कोच होणार’, सचिनने केला खुलासा

गौतम गंभीरनं 2018मध्ये KKRचे कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी दिनेश कार्तिकच्या खांद्यावर देण्यात आली. कार्तिकच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत एकदाही फायनलपर्यंत मजल मारलेली नाही. दुसरीकडे युवा खेळाडू शुभमन गील सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. लवकरच त्याला टीम इंडियातही स्थान मिळू शकते.

वाचा-भारताकडून खेळण्यासाठी पाकचा दिग्गज खेळाडू उत्सुक! विराट देणार संधी?

निराशाजनक होता 2019मध्ये KKRचा प्रवास

आयपीएल 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स टीमचा प्रवास खूप निराशाजनक होता. संघाने लीग सामन्यात चांगली कामगिरी बजावली परंतु शेवटी कमी रनरेटमुळे प्ले-ऑफसाठी पात्र होऊ शकला नाही आणि आयपीएल 2019 ला निरोप देऊन 5 व्या स्थानावर राहिली. परंतु आता फ्रँचायझीने आगामी मोसमातील संघापेक्षा पूर्वीचे संघ अधिक मजबूत केले आहे. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिकचा संघ यावेळी विजेतेपद जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसते.

First published: January 23, 2020, 1:36 PM IST

ताज्या बातम्या