Home /News /sport /

भारताकडून खेळण्यासाठी पाकचा दिग्गज खेळाडू उत्सुक! विराट देणार संधी?

भारताकडून खेळण्यासाठी पाकचा दिग्गज खेळाडू उत्सुक! विराट देणार संधी?

गेली 18 वर्ष भारताविरुद्ध खेळणारा हा फलंदाज आता भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.

    कराची, 23 जानेवारी : पाक क्रिकेट संघात नेहमीच असंतोषाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. मग ते खेळाडूंमधील एकमेकांविरूद्ध भेदभाव करीत असतील किंवा संघ व्यवस्थापनात गटबाजी. अलीकडेच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने उर्वरित खेळाडूंनी संघाचा हिंदू फिरकीपटू डॅनिश कनिरियाशी चांगले वर्तन केले नाही हे उघड केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याचवेळी पाकिस्तानचा महत्त्वपूर्ण यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने मिसबाह उल हक यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीला लक्ष्य केले आहे. वाचा-रिक्षाचालकाचा मुलगा सुस्साट! फलंदाजांना कळण्याआधीच दांड्या केल्या गुल, पाहा VIDEO 60.40च्या सरासरीनं केल्या आहेतत 906 धावा पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलला (Kamran Akmal) 2017नंतर पाक संघात जागा मिळालेली नाही आहे. 2017मध्ये त्यानं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र असे असले तरी घरच्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. पाकमध्ये खेळल्या जाणाऱ्या कायदे आजम ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कामरान दुसऱ्या क्रमांकावर आहे. अकमलनं 60.40च्या सरासरीनं 906 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. कामरान सेंट्रल पंजाब संघाकडून खेळतो. वाचा-सचिन, विराटसारखंच दुःख गिळून तो तडफेनं खेळला मैदानात; राज्याला मिळवून दिलं गोल्ड ‘गेली पाच वर्षे कामगिरीत सातत्य’ घरगुती क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही राष्ट्रीय संघात न निवडल्याबद्दल कामरान अकमलने मिसबाह उल हक यांना लक्ष्य केले आहे. तो म्हणाला, 'मी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे आणि गेली पाच वर्षे मी सतत कामगिरी करत आहे. आपण एक नवीन प्रणाली आणली, ज्यात चांगल्या दर्जाचे, उत्तम प्रतिभा आणि उत्कृष्ट कामगिरीचे खेळाडू थेट निवडले जातील. म्हणून मी भारत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जावे का? त्यासाठीही मी तया आहे. वाचा-न्यूझीलंडमध्ये पोहोचताच विराट जिममध्ये तर शास्त्री गुरुजी फिरायला, PHOTO VIRAL कामरान अकमल यांचे प्रोफाइल पाकिस्तानकडून विकेटकीपर फलंदाज कामरान अकमलने 53 कसोटी सामन्यांमध्ये 30.79च्या सरासरीनं 6 शतके आणि 12 अर्धशतकांसह 2 हजार 648 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 157 एकदिवसीय सामन्यात 26.09च्या सरासरीनं 5 शतके आणि 10 अर्धशतकांच्या मदतीने 3236 धावा केल्या आहेत. इतकेच नाही तर कामरानने पाकिस्तानकडून 58 टी -20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 21 सरासरीने 987 धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या