Home /News /sport /

‘...म्हणून ऑस्ट्रेलियाचा कोच होणार’, सचिनने केला खुलासा

‘...म्हणून ऑस्ट्रेलियाचा कोच होणार’, सचिनने केला खुलासा

ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावून आला सचिन! आता थेट होणार कोच

    मुंबई, 23 जानेवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र पहिल्यांदाच सचिन प्रशिक्षकाच्या भुमिकेत दिसणार आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत 50 कोटीहून जास्त प्राण्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर येथील जनजीवन पुन्हा पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातील सर्व खेळाडू मदत करत आहेत. यात सचिन तेंडुलकरही सामिल झाला आहे. यासाठी आता दिग्गज फलंदाज रिकी पॉटिंग आणि शेन वॉर्न यांनी बुशफायर क्रिकेट बॅश स्पर्धा 8 फेब्रुवारीला आयोजित केली आहे. या स्पर्धेत रिकी पॉटिंग संघाचा कोच म्हणून सचिन मैदानात उतरणार आहे. याबाबत सचिननं, “ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत होरपळलेल्यांना मदत करण्यासाठी मी उतरलो आहे, याचा आनंद आहे. अपेक्षा आहे की मी येथील पिडीतांना जास्तीत जास्त मदत करेन”, असे सांगितले. वाचा-भारताकडून खेळण्यासाठी पाकचा दिग्गज खेळाडू उत्सुक! विराट देणार संधी? यापूर्वी पॉन्टिंगने एका ट्विटमध्ये तेंडुलकरला टॅग करत, “बुशफायर क्रिकेट बॅशमध्ये सचिनन सामिल होणे खुप चांगली बाब आहे. कोचिंगसाठी त्याने योग्य संघाची निवड केली”, असे ट्वीट केले होते. वाचा-रिक्षाचालकाचा मुलगा सुस्साट! फलंदाजांना कळण्याआधीच दांड्या केल्या गुल, पाहा VIDE वाचा-सचिन, विराटसारखंच दुःख गिळून तो तडफेनं खेळला मैदानात; राज्याला मिळवून दिलं गोल्ड याआधी आगीत बळी पडलेल्यांना मदत करण्यासाठी अनेक क्रिकेटपटू पुढे आले आहेत. वॉर्न आणि जेफ थॉमसन यांनी त्यांच्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलावही केला. बिग बॅश लीगमधील प्रत्येक सहा जणांना दोनशे आणि पन्नास डॉलर्सचे दान देतील असे ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल आणि डार्सी शॉर्ट यांनी सांगितले. वाचा-न्यूझीलंडमध्ये पोहोचताच विराट जिममध्ये तर शास्त्री गुरुजी फिरायला, PHOTO VIRAL गतवर्षी अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही आग धगधगत आहे. या आगीनं आतापर्यंत 50 कोटीहून अधिक प्राण्यांचा जीव घेतला आहे. अखेर अचानक पडलेल्या पावसामुळं ही आग नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले. मात्र ऑस्ट्रेलियातील जीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदतीचा हाक दिली जात आहे. दरम्यान, या मदतकार्यासाठी आता क्रिकेटपटू पुढे आले आहे. याआधी शेन वॉर्ननं आपल्या आवडत्या टोपीचा लिलाव केला होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या