कराची, 23 जानेवारी : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखला जातो. आता तर त्यानं भारताच्या माजी वीरेंद्र सेहवागवर खालच्या पातळीची टीक केली आहे. शोएबनं सेहवागवर टीका करत, “तुझ्या डोक्यावर एवढे केस नाहीत जेवढा माझ्याकडे पैसा आहे”, अशी टीका केली. याआधी वीरेंद्र सेहवागनं शोएब अख्तर भारतीय क्रिकेट आणि त्याच्या क्रिकेटपटूंचे खूप कौतुक करीत आहेत कारण त्यांना अधिकाधिक पैसे कमवायचे आहेत, अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी अख्तरनं एक व्हिडीओ तयार केला.
रावळपिंडी एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असलेल्या अख्तरनं आपल्या युट्युब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये शोएबनं, “माझ्याकडे तुमच्या डोक्यावर जेवढे केस नाहीतर तेवढे पैसे आहे. जर तुम्ही हे मान्य करू शकत नाही आहात की माझे फॉलोअर्स जास्त आहेत तर मी काही करू शकत नाही. शोएब अख्तर घडवायला मला 15 वर्षे लागली. हो, मी भारताचे कौतुक करतो. पण मी त्यांच्यावर टीकाही करतो जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी चांगली कामगिरी केली नव्हती”, असे म्हटले आहे.
वाचा-भारताकडून खेळण्यासाठी पाकचा दिग्गज खेळाडू उत्सुक! विराट देणार संधी?
शोएबनं भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात मुंबईत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यावर भाष्य केले होते. या सामन्यात भारताचा 10 विकेटनं पराभव केला होता. त्यानंतर भारतानं केलेल्या कमबॅकचे अख्तरने कौतुकही केले होते. यावेळी अख्तरनं कोहली म्हणजे ‘एक असाधारण नेतृत्वकर्ता', असे गौरोद्गार काढले होते.
वाचा-‘...म्हणून ऑस्ट्रेलियाचा कोच होणार’, सचिनने केला खुलासा
वाचा-रिक्षाचालकाचा मुलगा सुस्साट! फलंदाजांना कळण्याआधीच दांड्या केल्या गुल, पाहा VIDEO
44 वर्षीय अख्तरनं सेहवागची टीका करताना, 'जेव्हा मी क्रिकेटशी संबंधित विषयांवर माझे मत देतो, तेव्हा लोकांना काय त्रास होईल हे मला समजत नाही. मी 15 वर्षे पाकिस्तानकडून खेळलो आहे, मी फक्त यूट्यूबसाठी प्रसिद्ध नाही. मी जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होतो. तसेच, 'मला फक्त एका पाकिस्तानी यु ट्यूबरचे नाव सांगा, जेव्हा जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो तेव्हा भारताची प्रशंसा करत नाही. रमीझ राजा, शाहिद आफ्रिदी हे सर्व चांगले खेळतात तेव्हा भारतीय संघाचे कौतुक करतात. मला एक गोष्ट सांगा - 'मेन इन ब्लू' खरंच जगातील पहिला क्रमांक आहे हे बरोबर नाही, कोहली जगातील नंबर -1 फलंदाज आहे हे बरोबर नाही काय? ', असे म्हणत सेहवागवर टीका केली. याआधी सेहवाग आणि अख्तर यांचे मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेकवेळा वाद झाले आहे.