IND vs AUS : शतक एक विक्रम अनेक! कांगारूंची शिकार करत 'हिटमॅन'ने सचिनलाही टाकले मागे

IND vs AUS : शतक एक विक्रम अनेक! कांगारूंची शिकार करत 'हिटमॅन'ने सचिनलाही टाकले मागे

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या निर्णायक सामन्यात रोहित शर्मानं आपले 29वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले.

  • Share this:

बंगळुरू, 19 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या निर्णायक सामन्यात रोहित शर्मानं आपले 29वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 287 धावांच्या आव्हाना पाठलाग करताना रोहितनं 110 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर नववर्षात शतकी खेळी करणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे, याआधी शिखर धवननं दुसऱ्या टी-20 सामन्यात 96 धावांची खेळी केली. रोहितनं शतकी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र रोहित शर्मा 128 चेंडूत 119 धावा करत बाद झाला.

रोहित शर्माचे हे 29वे एकदिवसीय शतक असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले हे 8वे शतक आहे. याचबरोबर रोहितनं 29वे शतक करण्याची कामगिरी फक्त 217 सामन्यांत केली आहे. यासह त्यानं सचिन तेंडुलकर (265) आणि रिकी पॉटिंग (330) यांना मागे टाकले आहे. याआधी विराटनं 29 शतक करण्यासाठी 185 सामने घेतले होते. रोहित शर्मानं वर्ल्ड कपपासून आपला फॉर्म सोडलेला नाही आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर प्रत्येक मालिकेत रोहितनं चांगली कामगिरी केली आहे.

वाचा-VIDEO : स्मिथने आपल्याच कर्णधाराला दिला धोका, फिंचने मैदानातच घातल्या शिव्या!

वाचा-टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूने हातात बंदूक घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या या निर्णायक सामन्यात रोहितनं 287 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटसोबत शतकी भागीदारी केली आहे. याआधी सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या केएल राहुलसोबत 61 धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्या सामन्यात रोहितला क्षेत्ररक्षण करत असताना खांद्याला दुखापतही झाली होती. मात्र त्यानं कमबॅक करत बंगळुरूमध्ये शतकी खेळी केली.

वाचा-भारताचा स्टार गोलंदाज सोडणार देश, इंग्लंडमधून क्रिकेट खेळण्याच्या तयारीत!

वाचा-‘3 दिवसांत फिट हो नाहीतर...’, हार्दिक पांड्याला निवड समितीनं दिली डेडलाईन

सर्वात जलद पार केला 9 हजारांचा टप्पा

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने 9 हजार धावा पूर्ण केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा जगातील तिसरा वेगवान खेळाडू आहे. हा आकडा गाठण्यासाठी रोहितने 217 सामने खेळले. याआधी विराटनं 194 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यामुळं सर्वात वेगवान 9 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ एबी डिव्हिलियर्सने 208 डावांमध्ये ही कामगिरी केली. विशेष म्हणजे रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीची सुरूवात अत्यंत संथ शैलीने केली होती. रोहितने 82 डावांमध्ये 2000 वनडे धावा पूर्ण केल्या. 2000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा सर्वात कमी गतीनं धावा करणारा भारतीय खेळाडू होता. यानंतर रोहित शर्माने धावांची भागीदारी केली आणि पुढच्या 7 हजार धावा खूप वेगात केल्या.

First published: January 19, 2020, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading