नवी दिल्ली, 19 जानेवारी : गेल्या वर्षभरात जगभरातील क्रिकेटपटू मानसिक स्वाथ्यामुळे चिंतेत आहेत. यात क्रिकेटपासून दूर असलेल्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. काही खेळाडूंनी यावर उघडपणे भाष्यही केले आहे. दरम्यान अशाच एका भारतीय जलद गोलंदाजाने संघात जागा मिळाली नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. या भारतीय गोलंदाजाचे नाव आहे प्रवीण कुमार. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार, प्रवीण कुमारनं भारताकडून तब्बल 84 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र दोन महिन्यांपूर्वी संघात जागा मिळाली नाही म्हणून याच प्रवीणनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रवीणनं भारताकडून अखेरचा सामना आठ वर्षांपूर्वी खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आले नाही. याच नैराश्यातून प्रवीण कुमारनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रवीणं स्वत: याबाबत खुलासा केला होता. मात्र त्याच्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या एका फोटोने त्याचे मन वळवले. वाचा- भारताचा स्टार गोलंदाज सोडणार देश, इंग्लंडमधून क्रिकेट खेळण्याच्या तयारीत! बंदूक घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न प्रवीण कुमारनं (Praveen Kumar ) भारताकडून 6 कसोटी, 68 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. मार्च 2012मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध प्रवीणनं अखेरचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघाता जागा मिळाली नाही. त्यामुळं गेली 8 वर्ष प्रवीण भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी धडपडत होता. अखेर मेरठमध्ये राहत्या घरी त्यानं सकाळीच हातात बंदूक घेऊन हायवेवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची आत्महत्या करण्याची हिम्मत झाली नाही. अखेर तो घरी परतला आणि आपल्या मुलांना मिठी मारली. वाचा- ‘3 दिवसांत फिट हो नाहीतर…’, हार्दिक पांड्याला निवड समितीनं दिली डेडलाईन मुलांच्या फोटोने बदलले मन प्रवीण कुमारनं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, “डोक्यात आत्महत्येचे विचार चालू असताना गाडीत असलेल्या मुलांच्या फोटोवर माझी नरज गेली. त्यांचा हसतानाचा फोटो पाहून माझ्या चेहऱ्यावर हसु आले. मुलांचा फोटो पाहून माझ्या मनात सकारात्मक विचार येण्यास सुरुवात झाली”, असे सांगितले. वाचा- टीम इंडियाची निवड कोण करणार? बीसीसीआयने ठेवल्यात ‘या’ अटी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







