‘3 दिवसांत फिट हो नाहीतर...’, हार्दिक पांड्याला निवड समितीनं दिली डेडलाईन

‘3 दिवसांत फिट हो नाहीतर...’, हार्दिक पांड्याला निवड समितीनं दिली डेडलाईन

भारतीय संघावर सध्या दुखापतींचे ग्रहण आहे. त्यामुळे अद्याप न्यूझीलंड दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.

  • Share this:

बंगळुरू, 19 जानेवारी : भारतीय संघावर सध्या दुखापतींचे ग्रहण आहे. त्यामुळे अद्याप न्यूझीलंड दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं निवड समितीनं लवकरात लवकर संघाची निवड करण्यासाठी भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याला डेडलाईन दिली आहे.

त्यामुळं पांड्याची तंदुरुस्तीची स्पष्ट झाल्यानंतरच निवड समिती न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारताची कसोटी आणि एकदिवसीय संघाची निवड करेल. यापूर्वी ही बैठक रविवारी होणार होती, मात्र आता काही दिवसानंतर या संघाची निवड होईल. सूत्रांच्या माहितीनुसार पांड्याला तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतरच त्याला वनडे आणि कसोटी संघात स्थान देण्यात येईल.

वाचा-ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत, “हार्दिक पांड्याला संघात जागा मिळवण्यासाठी फिट होणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीनं हार्दिकच्या फिटनेसवर ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात येईल”, असे सांगितले.

वाचा-टीम इंडियाची निवड कोण करणार? बीसीसीआयने ठेवल्यात 'या' अटी

हार्दिकच्या जागी सूर्यकुमारला संधी मिळू शकेल

दरम्यान, हार्दिक तंदुरुस्त होण्याच अपयशी ठरल्यास सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळू शकते. रणजी क्रिकेटमध्ये मुंबईचा कर्णधार असलेला सूर्यकुमार कुमार आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळं कसोटी संघात स्थान मिळू शकते. त्याचबरोबर लोकेश राहुलही कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रबळ दावेदार आहे.

वाचा-धोनीनं दिली होती संधी, आता विराट संपवणार ‘पुणेकर’ खेळाडूचे करिअर!

नवदीप सैनीला संधी मिळण्याची शक्यता आहे

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत कुलदीप यादव म्हणून तिसरा फिरकीपटू घेण्याऐवजी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला न्यूझीलंडमधील रविचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जडेजा यापैकी एकाला संघात जागा मिळू शकते. त्याचप्रमाणे भारतीय संघ व्यवस्थापन पांड्याला गोलंदाजीसाठी तंदुरुस्त होण्याची वाट पाहत आहे आणि जर तो तंदुरुस्त असेल तर त्याची वन डेमधील निवड निश्चित आहे.

First published: January 19, 2020, 1:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading