भारताचा स्टार गोलंदाज सोडणार देश, इंग्लंडमधून क्रिकेट खेळण्याच्या तयारीत!

भारताचा स्टार गोलंदाज सोडणार देश, इंग्लंडमधून क्रिकेट खेळण्याच्या तयारीत!

भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंपेक्षा संघाबाहेर असलेल्या खेळाडूंची संख्या जास्त आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंपेक्षा संघाबाहेर असलेल्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. त्यामुळं येत्या काळात बहुतांश क्रिकेटपटूंनी आपला देश सोडत संन्यास किंवा इतर देशांकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत आता भारताच्या आणखी एक क्रिकेटपटूचे नाव सामिल झाले आहे. भारतीय संघाबाहेर असलेला जलद गोलंदाज उमेश संघात जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सध्या विराट कोहली संघात बदल करेल, अशी चिन्हे दिसत नाही आहेत.

त्यामुळं टीम इंडिया जागा न मिळालेला उमेश यादव आता इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे. याबाबतच नुकत्याच एका कार्यक्रमात उमेशनं भारतीय निवड समितीला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. उमेशनं यावेळी, 'निवड समितीनं कामात संतुलन ठेवले पाहिजे. मात्र माझ्याबाबत उलट घडले. मी गेल्या दोन वर्षात (2018 आणि 2019) फारच कमी खेळलो आहे. त्यामुळे माझ्यावर विशेष कार्यभार नाही', असे सांगितले.

वाचा-‘3 दिवसांत फिट हो नाहीतर...’, हार्दिक पांड्याला निवड समितीनं दिली डेडलाईन

उमेशनं गेल्या 2 वर्षात खेळले 8 कसोटी सामने

उमेश यादव सध्या रणजी क्रिकेटमधून विदर्भ संघाकडून खेळत आहे. तर, भारताकडून त्याने 45 कसोटी सामन्यात 142 विकेट घेतल्या आहेत. याबाबत उमेशने, ‘ मी आता 31 वर्षांचा आहे. त्यामुळं माझ्यासाठी येणारी 4-5 वर्ष महत्त्वाची आहेत. गेल्या वर्षी मी फक्त 4 कसोटी सामने खेळले आहेत. तर, 2018मध्येही 4 कसोटी खेळले आहेत. तर, सफेद चेंडूत एकच सामना खेळला आहे’, असे सांगत आपली चिंता व्यक्त केली.

वाचा-टीम इंडियाची निवड कोण करणार? बीसीसीआयने ठेवल्यात 'या' अटी

‘आयपीएलनंतर एकही सामना न खेळणे भीतीदायक’

उमेशनं 2019मध्ये चार कसोटी सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत. आता उमेश तीन रणजी सामने खेळत आहे. याबाबत त्याने, “या वयात जेवढा जास्त वेळ क्रिकेट खेळेन तेवढा गोलंदाजीसाठी फायदा होईल, त्यासाठी मी सध्या मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे’, असे सांगितले. उमेशनं 75 एकदिवसीय सामन्यात 106 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप टी-20आधी फक्त आयपीएल आणि न्यूझीलंड दौरा होणार आहे. त्यामुळं उमेशला या मालिकेत संधी मिळाली नाही तर त्याला टी-20 वर्ल्ड कपला मुकावे लागले.

वाचा-पृथ्वी शॉची न्यूझीलंडमध्ये फटकेबाजी, टीम इंडियात लागणार वर्णी

2019मध्ये मिळाली नव्हती काउंटी क्रिकेट खेळण्याची संधी

दरम्यान, काउन्टी क्रिकेट का खेळत नाही या प्रश्नावर उमेशनं 'गेल्या हंगामात मला ग्लॉस्टरशायर कंट्रीची ऑफर मिळाली होती. त्यांच्याकडून मला सात सामने खेळायचे होते. मात्र बीसीसीआयकडून मला फक्त दोन किंवा तीन सामने खेळण्याची परनावगी दिली होती त्यामुळं मी गेले नाही. मात्र यावेळी मी प्रयत्न करेन’, असे सांगितले.

First published: January 19, 2020, 2:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading