VIDEO : स्मिथने आपल्याच कर्णधाराला दिला धोका, फिंचने मैदानातच घातल्या शिव्या!

VIDEO : स्मिथने आपल्याच कर्णधाराला दिला धोका, फिंचने मैदानातच घातल्या शिव्या!

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णयाक सामन्यात कर्णधार अरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यात बाचाबाची झाल्यास दिसून आले.

  • Share this:

बंगळुरू, 19 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णयाक सामन्यात कर्णधार अरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यात बाचाबाची झाल्यास दिसून आले. पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार फिंचला तिसऱ्या सामन्यात केवळ 19 धावांव बाद व्हावे लागले. फिंचच्या विकेट मागे कारण होता त्याच्याच संघातील खेळाडू. स्मिथच्या एका चुकीमुळे फिंचला आपली विकेट गमवावी लागली. त्यामुळं फिंचने रागात स्मिथला शिव्याही घातल्या. मात्र त्यानंतर स्मिथनेच 131 धावांची खेळी करत आपल्या संघाला सावरत 286 पर्यंत मजला मारली.

तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला 287 धावांचे आव्हान दिले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या डावात एक विचित्र प्रकार घडला. चिन्नास्वामी मैदानाच्या पाटा पिचवर वॉर्नर केवळ 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर फिंच आणि स्मिथ फलंदाजीची धुरा सांभाळत असताना स्मिथनं मोठी चूक केली.

वाचा-स्मिथच्या शतकी खेळीनंतर शमीचा कहर, मालिका विजयासाठी भारताला 287 धावांचे आव्हान

सामन्याच्या 9व्या ओव्हरमध्ये फिंच रनआऊट झाला. शमीच्या चेंडूवर स्मिथ बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना जडेजानं चेंडू अडवला. याचदरम्यान स्मिथनं एक धाव काढण्यासाठी फिंचला आवाज दिला. मात्र जडेजाच्या हातात चेंडू पाहता त्यानं अचानक फिंचला नकार देत माघारी पाठवले. मात्र जडेजाच्या थ्रोमुळे फिंच धावबाद झाला. बाद झाल्यानंतर फिंच रागात दिसता, त्यानं स्मिथला शिव्याही घातल्या.

वाचा-टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूने हातात बंदूक घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न

 

वाचा-भारताचा स्टार गोलंदाज सोडणार देश, इंग्लंडमधून क्रिकेट खेळण्याच्या तयारीत!

स्मिथची रेकॉर्डब्रेक शतकी खेळी

स्मिथ वगळता ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. तर, स्मिथनं 131 धावांची खेळी केली. मुख्य म्हणजे स्मिथचे हे एकदिवसीय क्रिकेटमधले 9वे तर भारताविरुद्ध केलेले तिसरे शतक आहे. तर, भारतात केलेले पहिले शतक आहे. भारताविरुद्ध 10व्या आंतरराष्ट्रीय शतका केल्यानंतर स्मिथनं जयवर्धनेची बरोबरी केली आहे. सध्या भारताविरुद्ध 14 आंतरराष्ट्रीय शतकी खेळी करण्याचा विक्रम रिकी पॉंटिंगच्या नावावर आहे.

First published: January 19, 2020, 6:05 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading