पर्थ, 30 ऑक्टोबर: रोहित शर्माच्या टीम इंडियाला यंदाच्या टी20 वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेनं पर्थमधल्या महत्वाच्या सामन्यात टीम इंडिया चा 5 विकेट्सनी पराभव केला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला हाच पराभव भारतासाठी लकीही ठरु शकतो. असं आम्ही नाही तर टीम इंडियाच्या एका माजी दिग्गज खेळाडूनं म्हटलं आहे. आणि यासाठी त्यानं 2011 च्या वन डे वर्ल्ड कपचा दाखला दिला आहे. पण तुम्हाला माहित आहे त्या वर्ल्ड कपमध्ये काय घडलं होतं? 2011 साली काय घडलं होतं? महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं 2011 साली वर्ल्ड कप जिंकला होता. पण या वर्ल्ड कप मोहिमेत भारतीय संघाला केवळ एकाच टीमनं हरवलं होतं. ती टीम होती ग्रॅमी स्मिथची दक्षिण आफ्रिका. सचिन तेंडुलकरचं शतक आणि वीरेंद्र सेहवागच्या वेगवान 71 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियानं त्या सामन्यात 296 धावांचा डोंगर उभारला होता. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं भारतानं दिलेलं लक्ष्य पार केलं होतं. त्या एकमेव सामन्याचा अपवाद वगळता भारतीय संघ त्या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहिला होता. पुढे श्रीलंकेचा पराभव करुन धोनीच्या टीमनं नवा इतिहास घडवला.
याच घटनेचा दाखला देत टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं एक भविष्यवाणी केली आहे. सेहवागच्या मते टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरली पण आशा आहे की इथून पुढे आपण सगळे सामने जिंकू. सेहवागनं यासंदर्भात एक ट्विटही केलं आहे. सेहवाग म्हणतो… ‘वेल डन साऊथ आफ्रिका… टीम इंडिया शेवटपर्यंत चांगली लढली पण 133 धावा पुरेशा नव्हत्या. पण हे थोडं 2011 च्या वन डे वर्ल्ड कपशी मिळतंजुळतं आहे. दक्षिण आफ्रिकेकडून त्यावेळी भारतीय संघ ग्रुप स्टेजला हरला होता. आशा करुयात इथून पुढे आपण सगळे सामने जिंकू.’
Well Done South Africa. India fought well till the end but 133 wasn’t enough
— Virender Sehwag (@virendersehwag) October 30, 2022
Similar to the 50 over 2011 World Cup , India lose to South Africain group stage. Hopefully will win all from here. #INDvsSA
हेही वाचा - Ind vs SA: टीम इंडिया हरली आता पाकिस्तानचं काय होणार? पॉईंट टेबलमध्ये झालाय मोठा उलटफेर रोहितची टीम इंडिया इतिहास घडवणार? आता सेहवाग जे म्हणाला त्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. कारण 2007 नंतर टीम इंडियानं एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. गेली 15 वर्ष टीम इंडिया दुसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या या टीमकडून करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहेत. त्यामुळे वीरेंद्र सेहवागनं केलेली भविष्यवाणी आता खरी ठरावी हीच अपेक्षा