लंडन, 26 मे : इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकाला केवळ 4 दिवस उरले असताना, सर्व संघ जय्यत तयारी करित आहेत. दरम्यान विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ पहिल्यांदाच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. 30 मेपासून विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होत असली तरी, भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. मात्र, भारतीय संघ सराव सामन्यांसाठी याआधीच इंग्लंडला पोहचला आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघ निळ्या जर्सीत दिसणार आहे. मात्र, भारतीय संघ भगव्या रंगाच्या दुसऱ्या जर्सीतही दिसण्याची शक्यता काही वृत्तसंस्थांनी व्यक्त केली. त्यामुळं भारतीय संघाकडे भगव्या रंगाची एक वेगळी किट आहेत. न्यु इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीनं एकाच रंगाची जर्सी घालणाऱ्या संघांना आपली सामनादरम्यान त्यातील एका संघाला आपली जर्सी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या जर्सीचा रंग समान असल्यामुळं भारतानं भगव्या रंगाची जर्सीही बनवून घेतली आहे. विश्वचषकात भारत, इंग्लंड, अफगाणिस्ता, श्रीलंका या संघांची जर्सी निळ्या रंगाची आहे. या संघात सामने होत असताना एकाच रंगाच्या जर्सीमुळं चाहत्यांना आणि समालोचकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळं फुटबॉलमध्ये जो नियम वापरला जातो तो आता आयसीसी क्रिकेटमध्येही वापरला जाणार आहे.आयसीसीनं भारताला दुसऱ्या रंगाच्या जर्सीसाठी रंग निवडण्याची संधी दिली होती. त्यावेळी भगवा रंग निवडण्यात आला. मात्र, बीसीसीआयनं आतापर्यंत दुसरी किट किंवा त्या संदर्भात माहिती दिलेली नाही. याआधी भारत आपल्या परंपरांगत असलेल्या निळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरेल. दुसरीकडे बांगलादेश, पाकिस्तान यांच्यातही असेच झाले होते. त्यांच्या जर्सी एकसारख्या असल्यामुळं बांगलादेशला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागला होता. दरम्यान भारत कोणत्या सामन्यात भगव्या रंगाची जर्सी परिधान करेल, याबाबत माहिती मिळालेली नाही. असे असतील भारताचे सामने 5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता) 9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता) 13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता) 16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता) 22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता) 27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता) 30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता) 2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता) 6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता) वाचा-World Cup : भारताच्या ‘मिशन’ वर्ल्डकपला धक्का, पहिल्याच सामन्यात विराटसेनेचे वस्त्रहरण ! वाचा-World Cup : सामना गमावल्यानंतर विराटसाठी खुशखबर, अखेर चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटणार वाचा-फक्त खेळाडूच नाही तर ‘या’ पाच हॉट अॅंकरही गाजवणार ICC Cricket World Cup वाचा-अर्जुन तेंडुलकरवर बरसला ‘हा’ मुंबईकर खेळाडू, 57 चेंडूतच ठोकले शतक वाचा-World Cup : एकेकाळी संघाचा होता कोच, निवृत्तीनंतर झाला इंग्लंडचा फिल्डर VIDEO: ‘हॉट’ मराठवाड्यामुळे नागरिकांचे हाल, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.