ओव्हल, 26 मे : विश्वचषकाला केवळ 4 दिवसांचा कालावधी उरला असताना, सर्व संघ जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. 30मे पासून सामन्यांना सुरुवात होत असली तरी, सध्या सर्व संघाचे सराव सामने सुरु आहेत. यातच भारताचा पहिला सामना न्युझीलंड विरोधात ओव्हलच्या मैदानावर रविवारी पार पडला. मात्र मुख्य सामन्यांना सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. परदेशी भूमीत तीन महिन्यांनंतर उतरणाऱ्या भारतीय संघाला याचा जबर फटका बसला. परिणामी पहिल्याच सराव सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. विराटच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानली जाणारी टीम इंडिया न्युझीलंडच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकताना दिसली. 50 षटकात फलंदाजांच्या वाईट कामगिरीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 179 धावा करता आल्या. या आव्हानाचा सहजपणे पाठलाग न्यूझीलंडने करत भारताला पराभूत केले. न्यूझीलंडने भारताचे आव्हान सहा विकेट्स राखून पूर्ण करत सहज विजय मिळवला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर या दोघांनी अर्धशतके झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. न्यूझीलंडकडून टेलरने सर्वाधिक 71 धावा केल्या.
Innings Break#TeamIndia all out for 179 in 39.2 overs in the first warm-up game. New Zealand chase coming up in half n hour.
— BCCI (@BCCI) May 25, 2019
Updates - https://t.co/FfZYgdZZsQ #CWC19 pic.twitter.com/MY0OX9rTvf
मधल्या फळीचा तिढा सुटेना विश्वचषकाच्या आधीपासूनच भारताला चिंता होती, ती मधल्या फळीची. चौथ्या क्रमांकाकरिता योग्य तो फलंदाज नसल्यामुळं त्याच्या शोध घेण्यासाठी सराव सामन्यात विराटनं केएल राहुलला उतरवले. मात्र त्याला चांगली फलंदाजी करता आली नागी. केवळ 6 धावा करत तो बाद झाला. त्यामुळं मुख्य सामन्यात चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न कायम आहे. जलद गोलंदाजीचा सामना कशी करणार विराटसेना ? भारतीय संघातील सर्वच खेळाडू जवळजवळ गेले 2 महिने आयपीएल खेळले आहेत. त्याआधी आस्ट्रेलियाविरोधात 5 एकदिवसीय सामने, टी-20 मालिका आपल्या घरच्या मैदानावर खेळले आहेत. त्यामुळं तब्बल 2-3 महिन्यांनंतर भारतीय संघ पहिल्यांदाचा भारताबाहेर खेळणार आहे. याचेच परिणाम पहिल्या सराव सामन्यात दिसले. भारताच्या खेळपट्टीप्रमाणेच इंग्लंडची खेळपट्टी असली तरी, चेंडूला मिळणारी उसळी भारतीय फलंदाजांसाठी घातक ठरते. त्याचाच प्रत्यय या सामन्यात दिसून आला. त्यामुळंच ट्रेंट बोल्टच्या जलद गोलंदाजीसमोर भारताच्या सलामी फलंदाजांनी नांगी टाकली. बुमराहाला साथ कोणाची ? भारताच्या फॉल्प फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्येही विशेष दम दिसला नाही. बुमराह वगळता कोणत्याही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 2 मेडन ओव्हरच्या जोरावर 2 विकेट घेतल्या. मात्र, इतर कोणत्याही जलद गोलंदाजाला आपली छाप सोडला आली नाही. त्यामुळं भारतानं अतिरिक्त चौथा जलद गोलंदाजाचा संघात समावेश न करण्याचा निर्णय त्यांना महागात पडू शकतो. खराब क्षेत्ररक्षण सराव सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षणही निकृष्ट दर्जाचे होते. दिनेश कार्तिकनं विल्यमसनचा सहज झेल सोडला. पांड्यानंही ओव्हर थ्रोमुळं रन आऊटची संधी गमावली. त्यामुळं भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर, क्षेत्ररक्षणही चांगले करायला हवे. मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना काय दिला सल्ला? या आणि इतर महत्त्वपूर्ण 18 घडामोडी, पाहा VIDEO