ओव्हल, 26 मे : विश्वचषकाला केवळ 4 दिवसांचा कालावधी उरला असताना, सर्व संघ जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. 30मे पासून सामन्यांना सुरुवात होत असली तरी, सध्या सर्व संघाचे सराव सामने सुरु आहेत. यातच भारताचा पहिला सामना न्युझीलंड विरोधात ओव्हलच्या मैदानावर शनिवारी पार पडला. मात्र मुख्य सामन्यांना सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. परदेशी भूमीत तीन महिन्यांनंतर उतरणाऱ्या भारतीय संघाला याचा जबर फटका बसला. परिणामी पहिल्याच सराव सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. त्यामुळं पुन्हा एकदा भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी ईएसपीन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघात अनपेक्षितरित्या स्थान मिळालेला अष्टपैलु खेळाडू विजय शंकर हा शुक्रवारी सराव करताना जखमी झाला होता. त्यामुळं विराटच्या चिंता वाढल्या होत्या. शंकर सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत सराव करत होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. फलंदाजीचा सराव करत असताना,डावखुरा गोलंदाज खलील अहमद गोलंदाजी करत होता. त्यावेळी त्यानं टाकलेल्या बाऊंसरचा सामना शंकर करु शकला नाही. त्यामुळं त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यानं लगेचच मैदान सोडावे लागले. मात्र आता विराटचे टेंशन काहीसे कमी होणार आहे कारण, बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, विजय शंकरच्या हाताला चेंडू लागला, मात्र कोणतेही फ्रॅक्चर त्याला झालेले नाही. त्यामुळं काळजी म्हणून त्याला न्युझीलंड विरोधात विश्रांती देण्यात आली होती. मात्र त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
UPDATE - Vijay Shankar was hit on his right forearm during practice on Friday. He underwent scans and no fracture has been detected. BCCI Medical Team is aiding him in his recovery pic.twitter.com/47ufzHtLX7
— BCCI (@BCCI) May 25, 2019
चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटणार विजय शकंरची निवड ही संघात चौथ्या क्रमांकासाठी करण्यात आली होती. मात्र विजय शंकरकडे केवळ 9 सामन्यांचा अनुभव असल्यामुळं त्याच्या निवडीवर अनेक वादंग झाले. मात्र केदार जाधव किंवा विजय शंकर दोघांपैकी एकाला चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजी करावी लागणार आहे. दरम्यान भारताचा पहिला सामना 5 जूनला साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. तर, दुसरा सराव सामना 28 मेला बांगलादेश विरोधात होणार आहे. कोण आहे विजय शंकर विजय शंकर हा तमिळनाडूचा खेळाडू असून रणजी सामन्यात त्यानं स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. विजय शंकर सगळ्या प्रथम श्रेणीतील सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज होता. त्याच्या या खेळीमुळेच विजयची वर्णी विश्वचषक संघात झाली असावी. त्याने केवळ 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर तेवढेच टी-20 सामने खेळले आहेत. त्यामुळं चौथ्या क्रमांकाकरिता विजय शंकरची वर्णी लगली असली तरी, त्याच्या निवडीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना काय दिला सल्ला? या आणि इतर महत्त्वपूर्ण 18 घडामोडी, पाहा VIDEO