लंडन, 26 मे : इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकाला केवळ 4 दिवस उरले असताना, सर्व संघ जय्यत तयारी करित आहेत. त्यामुळं सध्या सर्व संघ सराव सामन्यांमध्ये व्यस्त आहे. वॉर्म अप सामन्यांमुळं सर्वच संघानं इंग्लंडमधील परिस्थितीशी एकरुप होण्यास मदत होईल. दरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना बऱ्याच कारणांमुळं चर्चेत राहिला. आधी, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा चाहत्यांनी केलेला चीटर..चीटर म्हणून पाणउतारा आणि त्यानंतर तब्बल 8 वर्ष संघाबाहेत असलेल्या खेळाडूंनं मैदानात केलेले पुनरागमन. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा जलद गोलंदाज मार्क वुड जखमी झाल्यामुळं त्याला मैदाना सोडावे लागले. मात्र त्याची जागा मैदानात घेतली ती, 42 वर्षांच्या पॉल कॉलिंगवूडनं. पॉलला क्षेत्ररक्षण करताना पाहून सर्वच खेळाडू चक्रावले. कॉलिंगवूड तब्बल 8 वर्षांनी मैदानात उतरला एवढचं नाही तर, तो इंग्लंडसंघाचा प्रक्षिशकही होता. कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघानं टी-20 विश्वचषकही जिंकले होते. त्यामुळं अश्या खेळाडूला मैदानात पाहून सारेच चक्रावले.
Paul Collingwood fielding for England in the warm up game vs Australia#CWC19 #ENGvAUS pic.twitter.com/zclm9lmDqv
— Arham (@legsidehack) May 25, 2019
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सराव सामन्यात इंग्लंडला 12 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात स्टिव्ह स्मिथची शतकी खेळी विशेष ठरली. विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या इंग्लंड संघानं पहिला सराव सामना गमवल्यामुळं क्रिकेटप्रेमी नाराज आहेत. त्यामुळं इंग्लंडच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांना या सामन्यात बोध घ्यावा लागणार आहे. वाचा-World Cup : भारताच्या ‘मिशन’ वर्ल्डकपला धक्का, पहिल्याच सामन्यात विराटसेनेचे वस्त्रहरण ! वाचा-World Cup : सामना गमावल्यानंतर विराटसाठी खुशखबर, अखेर चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटणार वाचा-फक्त खेळाडूच नाही तर ‘या’ पाच हॉट अॅंकरही गाजवणार ICC Cricket World Cup वाचा-अर्जुन तेंडुलकरवर बरसला ‘हा’ मुंबईकर खेळाडू, 57 चेंडूतच ठोकले शतक VIDEO: ‘हॉट’ मराठवाड्यामुळे नागरिकांचे हाल, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी