मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: दोन भावात आज होणार काट्याची टक्कर, या टीमला 3 वेळा बनवले चॅम्पियन

IPL 2022: दोन भावात आज होणार काट्याची टक्कर, या टीमला 3 वेळा बनवले चॅम्पियन

GT VS LSG

GT VS LSG

आयपीएलच्या(IPL 2022) यंदाच्या हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन टीमच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही टीममध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही टीम आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 28 मार्च: आयपीएलच्या(IPL 2022) यंदाच्या हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन टीमच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही टीममध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही टीम आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे या सामन्यात दोन भावात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

दोन भावात आज होणार काट्याची टक्कर

हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावानंतर सर्व संघ बदलले आहेत, अनेक मॅचविनर खेळाडू यावेळीही आपल्या जुन्या संघांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. यावेळी आयपीएलमध्ये दोन भावांची जोडीही एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहे.

IPL 2022, GT vs LSG Team Prediction : 'हे' 11 खेळाडू करतील तुम्हाला मालामाल

पांड्या ब्रदर्स अर्थात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्या (Krunal Pandya)ज्यांनी आयपीएलमधून क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवला आहे, हे दोघे भाऊ देखील पहिल्यांदाच आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

दोन्ही भाऊ देशांतर्गत क्रिकेटमध्येही एकत्र खेळतात पण आयपीएलमध्ये ते वेगळे खेळताना दिसणार आहेत. पंड्या ब्रदर्स त्यांच्या आयपीएल पदार्पणापासूनच मुंबई इंडियन्सचा भाग होते परंतु त्यानंतर मुंबईने त्या दोघांमधील एकालीही रिटेन केले नाही.

गुजरात आणि लखनौ संघाचा विचार करता या दोन्ही संघानी यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग घेतला असला तरी दोन्ही संघातील खेळाडू मात्र कमालीचे अनुभवी आहेत. लखनौचा कर्णधार राहुलला याआधी पंजाब संघाचं नेतृत्त्व करण्याचा अनुभव देखील आहे. तर दुसरीकडे हार्दीक पहिल्यांदाच कर्णधार म्हणून आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे.

या टीमला 3 वेळा बनवले चॅम्पियन

हार्दिक पांड्याने 2015 मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हापासून हार्दिक मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता परंतु यावेळी हार्दिक गुजरात टायटन्सचा भाग असेल. गुजरात टायटन्स संघानेही हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे. हार्दिकने आयपीएलमध्ये एकूण 92 सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 1476 आणि 42 विकेट आहेत.

हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या हा देखील 2016 पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता पण यावेळी तो लखनौ सुपरजायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी मुंबई इंडियन्सला 3 वेळा चॅम्पियन बनवले होते.

First published:

Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022, Krunal Pandya, Lucknow Super Giants