मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022, GT vs LSG Team Prediction : 'हे' 11 खेळाडू करतील तुम्हाला मालामाल

IPL 2022, GT vs LSG Team Prediction : 'हे' 11 खेळाडू करतील तुम्हाला मालामाल

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील तिसऱ्या दिवशी 2 नव्या टीम पदार्पण करणार आहे. गुजरात टायटन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यात सोमवारी मॅच होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील तिसऱ्या दिवशी 2 नव्या टीम पदार्पण करणार आहे. गुजरात टायटन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यात सोमवारी मॅच होणार आहे. या मॅचनं या दोन्ही टीम आयपीएल स्पर्धेला सुरूवात करतील. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरातचा कॅप्टन असून केएल राहुलकडे (KL Rahul) लखनौचं नेतृत्त्व आहे. या दोन नव्या टीमच्या पहिल्या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वानखेडेच्या पिचवर बॉलर्सना बाऊन्स चांगला मिळतो. त्याची दोन्ही टीमनं काळजी घेणं आवश्यक आहे. हार्दिक पांड्या नव्या इनिंगची सुरूवात कशी करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. हार्दिकला या पिचवर मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर केएल राहुलचाही वानखेडेच्या पिचवरील रेकॉर्ड दमदार आहे.

लखनौची राहुलवर मोठी भिस्त असेल. राहुल आणि क्विंटन डी कॉक हे दोघं लखनौची इनिंग सुरूवात करतील. लखनौकडं दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या हे ऑल राऊंडर आहेत. तर आवेश खान आणि रवी बिश्नोई हे उपयुक्त बॉलरही आहेत. दुसरिकडं गुजरातच्या बॉलिंगची जबाबदारी राशिद खानवर (Rashid Khan) असेल. टी20 क्रिकेटचा मोठा अनुभव असलेल्या राशिदची गुजरात टायटन्सचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राशिदसह लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद शमी हे अनुभवी फास्ट बॉलर गुजरातकडे आहेत. तर गुजरातच्या बॅटींगची भिस्त कॅप्टन हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांच्यावर असेल.

IPL 2002 : गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय, राशिद खानवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

GT vs LSG Dream 11 Prediction

कॅप्टन - केएल राहुल

व्हाईस कॅप्टन - राशिद खान

विकेटकिपर - केएल राहुल

बॅटर - मनिष पांडे, डेव्हिड मिलर , दीपक हुड्डा शुभमन गिल

ऑल राऊंडर्स - हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दीपक हुड्डा

बॉलर - मोहम्मद शमी, आवेश खान, राशिद खान

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Lucknow Super Giants