Home /News /sport /

कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराट आणि रोहितचं काय झालं बोलणं? का सोडली कॅप्टन्सी?

कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराट आणि रोहितचं काय झालं बोलणं? का सोडली कॅप्टन्सी?

कर्णधारपद सोडण्यापूर्वी आपण अनेकांशी विचारविनिमय केला, असं कोहलीने सांगितलं. यामध्ये टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे.

    नवी दिल्ली, 16 सप्टेंबर:  विराट कोहलीने (Virat Kohli quits captaincy) T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World cup) तोंडावर आलेली असताना कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं आणि क्रिकेट जगतात (Indian Cricket news) खळबळ उडाली. विराटने स्वतःला थोडी स्पेस देऊ इच्छित असल्याचं सांगत T20 टीमचं कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे. विराटनंतर टीम इंडियाचं नेतृत्व उपकर्णधार म्हणून कार्यरत असलेल्या रोहित शर्माकडे येण्याची शक्यता आहे. विराटने अचानक टीम इंडियाचं नेतृत्व सोडण्याचं कारण काय? रोहित शर्मा आणि विराटचं काय बोलणं झालं? विराट कोहलीने याविषयी स्वतःच Twitter वर पोस्ट लिहून स्पष्ट केलं आहे. कर्णधारपद सोडण्यापूर्वी आपण अनेक मित्रांशी आणि मार्गदर्शकांशी विचारविनिमय केला, असं कोहलीने सांगितलं. यामध्ये टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. रवी शास्त्रींनी फेटाळली BCCI ची विनंती, टीम इंडियाला मिळणार नवा हेड कोच रोहित शर्माने कोहलीच्या अनुपस्थिती अनेक वेळा टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे. IPL मध्ये त्याने मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यामुळे कोहली पायउतार झाल्यानंतर त्याची जागा रोहित घेईल, हीच शक्यता जास्त आहे. "रवीभाई (रवि शास्त्री)आणि लीडरशिप ग्रूपचा महत्त्वाचा भाग असलेला रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करून मी या निर्णयाप्रत आलो आहे की, ऑक्टोबरमध्ये T20 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर मी भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त होईन. BCCI चे पदाधिकारी जय शाहा आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांनादेखील माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे", असं विराटने म्हटलं आहे. T20 World Cup: अश्विनच्या समावेशाबाबत गावसकरांचा धक्कादायक दावा, म्हणाले... कोहलीने याविषयी लिहिलं आहे की, "T20, वन डे आणि टेस्ट क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये गेली 8-9 वर्षं सातत्याने खेळत आहे. त्यातली 5-6 वर्ष तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणूनही मी काम केलं. या वर्कलोडचा विचार करता मला स्वतःला थोडी स्पेस देण्याची गरज वाटते. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून ODI आणि टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने मला स्वतःसाठी थोडा अवधी देण्याची गरज वाटते. म्हणूनच T20 World Cup संपल्यानंतर भारतीय T20 संघाचा कर्णधार म्हणून मी पायउतार होऊ इच्छितो', असं कोहलीने लिहिलं आहे. "T20 टीमचा फलंदाज म्हणून मी भविष्यात खेळत राहणार आहे", असंही त्याने स्पष्ट केलं आहे. "मी हा निर्णय खूप विचार करून आणि आप्तांशी विचारविनिमय करून घेतला आहे. रवीभाई (रवि शास्त्री)आणि लीडरशिप ग्रूपचा महत्त्वाचा भाग असलेला रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करून मी या निर्णयाप्रत आलो आहे की, ऑक्टोबरमध्ये T20 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर मी भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त होईन. BCCI चे पदाधिकारी जय शाहा आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांनादेखील माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे. मी यापुढेही माझं सर्वस्व भारतीय संघाचा खेळाडू म्हणून देत राहीन", असं विराट लिहितो.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Cricket, Rohit sharma, T20 cricket, T20 world cup, Virat kohli

    पुढील बातम्या