Home /News /sport /

Team India साठी मोठी बातमी! Virat Kohliने कर्णधारपद सोडलं

Team India साठी मोठी बातमी! Virat Kohliने कर्णधारपद सोडलं

T20 World Cup अगदी तोंडावर आलेला असताना विराट कोहलीने कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

    नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: Team India चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Step Down) याने आज एक मोठा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने भारतीय T20 संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. विराट कोहलीने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल भावुक होऊन सविस्तर पोस्ट लिहिली आहे. Twitter वर लिहिलेल्या या पत्राची सुरुवातच विराटने आभार प्रदर्शनाने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन म्हणून केलेल्या या वाटचालीत मला साथ देणाऱ्या सर्वांचे आभार, असं त्याने लिहिलं आहे. "T20, वन डे आणि टेस्ट क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये गेली 8-9 वर्षं सातत्याने खेळत आहे. त्यातली 5-6 वर्ष तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणूनही मी काम केलं. या वर्कलोडचा विचार करता मला स्वतःला थोडी स्पेस देण्याची गरज वाटते. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून ODI आणि टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने मला स्वतःसाठी थोडा अवधी देण्याची गरज वाटते. म्हणूनच T20 World Cup संपल्यानंतर भारतीय T20 संघाचा कर्णधार म्हणून मी पायउतार होऊ इच्छितो', असं कोहलीने लिहिलं आहे. "T20 टीमचा फलंदाज म्हणून मी भविष्यात खेळत राहणार आहे", असंही त्याने स्पष्ट केलं आहे. T20 World Cup: अश्विनच्या समावेशाबाबत गावसकरांचा धक्कादायक दावा, म्हणाले... "मी हा निर्णय खूप विचार करून आणि आप्तांशी विचारविनिमय करून घेतला आहे. रवीभाई (रवि शास्त्री)आणि लीडरशिप ग्रूपचा महत्त्वाचा भाग असलेला रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करून मी या निर्णयाप्रत आलो आहे की, ऑक्टोबरमध्ये T20 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर मी भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त होईन. BCCI चे पदाधिकारी जय शाहा आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांनादेखील माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे. मी यापुढेही माझं सर्वस्व भारतीय संघाचा खेळाडू म्हणून देत राहीन", असं विराट लिहितो.
    First published:

    Tags: Virat kohli

    पुढील बातम्या