जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup 2021: अश्विनच्या समावेशाबाबत गावसकरांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

T20 World Cup 2021: अश्विनच्या समावेशाबाबत गावसकरांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

T20 World Cup 2021: अश्विनच्या समावेशाबाबत गावसकरांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

टी20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) टीम इंडियात आर. अश्विनचा (R. Ashwin) समावेश करण्यात आला आहे. या निवडीवर सुनील गावसकरांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 सप्टेंबर : टी20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021)  टीम इंडियात आर. अश्विनचा (R. Ashwin) समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीमुळे अनेकांना धक्का बसलाय. अश्विन गेल्या चार वर्षांपासून टी20 टीमचा सदस्य नव्हता. त्याचबरोबर इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही त्याला बेंचवर बसवण्यात आलं होतं. टीम इंडियाचा माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी अश्विनच्या निवडीबाबत एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अश्विनला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचं सांत्वन करण्यासाठी निवड समितीनं ही निवड केली आहे, असा दावा गावसकर यांनी केला आहे. अश्विननं 46 आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच त्याचा इकॉनमी रेट 7 पेक्षा कमी आहे. तरीही तो अंतिम 11 मध्ये खेळेल असं गावसकर यांना वाटत नाही. ‘स्पोर्ट्स तक’ शी बोलताना गावसकर म्हणाले की, ’ अश्विनचं पुनरागमन ही चांगली गोष्ट आहे. पण त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळणार की नाही? हे पाहावं लागेल. इंग्लंडमध्येही तो टीमचा सदस्य होता. पण त्याला प्लेईंग 11 मधी संधी मिळाली नाही. कदाचित इंग्लंड दौऱ्यातील निराशा दूर करण्यासाठी त्याला टीममध्ये निवडण्यात आलं आहे. अश्विनचा आयपीएल रेकॉर्डही प्रभावी आहे. त्यानं यूएईमध्ये मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) 13 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या नावावर 156 आयपीएल मॅचमध्ये 139 विकेट्स आहेत. तसंच त्याचा इकॉनामी रेट हा 6.90 इतका आहे. रवी शास्त्रींनी फेटाळली BCCI ची विनंती, टीम इंडियाला मिळणार नवा हेड कोच टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम :  विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात