मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs WI- 2nd ODI Dream11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IND vs WI- 2nd ODI Dream11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IND vs WI: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात आज (बुधवार) 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत खेळली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 1-0 नं आघाडीवर आहे.

IND vs WI: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात आज (बुधवार) 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत खेळली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 1-0 नं आघाडीवर आहे.

IND vs WI: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात आज (बुधवार) 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत खेळली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 1-0 नं आघाडीवर आहे.

अहमदाबाद, 9 फेब्रुवारी:  भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात बुधवारी 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत खेळली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 1-0 नं आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकत मालिका जिंकण्याचा टीमचा प्रयत्न असेल. केएल राहुल (KL Rahul) वैयक्तिक कारणामुळे पहिल्या वन-डेमध्ये खेळू शकला नव्हता. श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि शिखर धवन हे टीम इंडियाचे खेळाडू कोरोनामुळे पहिल्या सामन्यात खेळू शकले नव्हते.  शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. यानंतर आता दोघांना सराव करायला परवानगी देण्यात आली आहे, पण दोघंही बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडेमध्ये खेळू शकणार नाहीत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 6 विकेटने विजय झाला होता. युझवेंद्र चहलच्या 4 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या 3 विकेटच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला 176 रनवर रोखलं. या आव्हानाचा पाठलाग भारताने 28 ओव्हरमध्येच केला. कर्णधार रोहित शर्माने 60 रनची खेळी केली. आता बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवत सीरिज खिशात टाकण्याची संधीही टीम इंडियापुढे आहे.

India vs West Indies, 2nd ODI Dream11 Prediction

कॅप्टन: केएल राहुल

व्हाईस कॅप्टन: जेसन होल्‍डर

विकेटकीपर: निकोलस पूरन

बॅटर: रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शामराह ब्रुक्स

ऑलराउंडर: जेसन होल्‍डर, वाशिंगटन सुंदर

बॉलर: युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्‍णा, मोहम्‍मद सिराज, अल्झारी जोसेफ

टीम इंडियाची न्यूझीलंड दौऱ्यात निराशाजनक सुरूवात, पहिल्याच मॅचमध्ये पराभव

टीम इंडिया:  रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हाईस कॅप्टन), मयंक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड़, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

वेस्ट इंडिज: कायरन पोलार्ड (कप्तान), फॅबियन एलेन, बोनर, डेरेन ब्राव्हो, शामराह ब्रुक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, अल्‍झारी जोसफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेपर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वाल्श ज्युनिअर.

First published:

Tags: Cricket news, Ishan kishan, Kl rahul, Rohit sharma, Shikhar dhavan, Shreyas iyer, Sports, Team india, West indies