जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाची न्यूझीलंड दौऱ्यात निराशाजनक सुरूवात, पहिल्याच मॅचमध्ये पराभव

टीम इंडियाची न्यूझीलंड दौऱ्यात निराशाजनक सुरूवात, पहिल्याच मॅचमध्ये पराभव

टीम इंडियाची न्यूझीलंड दौऱ्यात निराशाजनक सुरूवात, पहिल्याच मॅचमध्ये पराभव

भारतीय महिला टीमची (Indian Women Cricket Team) न्यूझीलंड दौऱ्याची सुरूवात निराशाजनक झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 फेब्रुवारी : भारतीय महिला टीमची (Indian Women Cricket Team) न्यूझीलंड दौऱ्याची सुरूवात निराशाजनक झाली आहे. दोन्ही टीममध्ये झालेल्या एकमेव टी20 सामन्यात यजमान टीमनं 18 रननं विजय मिळवला. न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हर्समध्ये 155 रन काढले. भारतीय टीमला 156 रनचं आव्हान पेलवलं नाही. निर्धारित 20 ओव्हरमध्ये टीमनं 7 आऊट 138 पर्यंत मजल मारली. भारतीय बॅटर्सनी या सामन्यात निराशा केली. एस. मेघना (37) आणि यस्तिका भाटीया (26) यांचा अपवाद वगळता एकाही बॅटरला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. शफाली वर्मा 13 तर कॅप्टन हरमनप्रीत कौर 12 रन काढून आऊट झाली. न्यूझीलंड सीरिजमधील हा एकमेव टी20 सामना होता. आता यानंतर भारतीय महिला टीम 5 वन-डे सामन्याची मालिका खेळणार आहे.

जाहिरात

यापूर्वी पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या न्यूझीलंडकडून सूजी बेट्सनं (Suzie Bates) 36 आणि सोफी डिव्हाईन (Sophie Devine) 31 यांनी टीमला चांगली सुरूवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 60 रनची पार्टनरशिप केली. भारताकडून पूजा वस्त्राकार आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर राजेश्वरी गायकवाडनं 1 विकेट घेतली. IPL 2022 : टीम इंडियातून बाहेर असूनही 5 खेळाडू मालामाल, 150 कोटींची केली कमाई न्यूझीलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा हा दौरा महत्त्वाचा आहे. वन-डे टीममध्ये टीम इंडियाची कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात