Home /News /sport /

Corona इफेक्ट : IPL बाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय?

Corona इफेक्ट : IPL बाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय?

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल रद्द होणार नाही पण चाहत्यांसाठी धक्कादायक असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 11 मार्च : चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसचा आता भारतातही शिरकाव झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं भीतीचं वातावरणही आहे. आता याचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही रद्द करण्याचं संकट ओढावलं आहे. यातच भारतात 29 मार्चपासून होणाऱ्या आयपीएलच्या 13 व्या हंगामावरही कोरोनाचं संकट आहे. आता आयपीएल होईल पण चाहत्यांसाठी धक्कादायक असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आयपीएल रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याची मागणी होत आहे. आयपीएल मॅच संदर्भात तिकीट विक्री करू नये फक्त मॅच सामने आयोजन करावे अशी भूमिका राज्य सरकारची आहे. सामन्यासाठी होणारी गर्दी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठरू शकते. कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. आयपीएलमध्ये काही स्टेकहोल्डर्सनी कोरोनामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र दुसरीकडे आयपीएलमध्ये सर्व संघांचे कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे स्पर्धा रद्द करण्याऐवजी रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्यासाठी संघमालकांमध्ये नाराजी आहे. एका कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, जर एका स्टेडियममध्ये 30 ते 40 हजार चाहते असतील तर पुढच्या 7 आठवड्यात कोरोना पसरण्याचा धोका जास्त असेल. त्यामुळे सध्या युरोपमध्ये जसं सुरु आहे किंवा अमेरिका जी तयारी करत आहे तसंच रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवता येतील का यावर चर्चा होत आहे. बीसीसीआय़ अध्यक्ष सौरव गांगुली आणि क्रीडा मंत्रालया यांच्यात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. गांगुली आयपीएल ठरलेल्या वेळेतच आयोजित करण्याच्या बाजूने असल्यानं स्पर्धा रद्द होण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी रिकाम्या स्टेडियममध्ये सामना होऊ शकतो. यामुळे क्रिकेटप्रेमींना प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन सामना पाहण्याचा आनंद लुटता येणार नाही. स्टेडियममध्ये होणाऱ्या तिकिट विक्रीतून कोणत्याही संघाला 8 ते 10 कोटी रुपये मिळतात. ही कमाई खूपच कमी आहे आणि बीसीसीआय याची भरपाई करू शकते. फक्त एक टक्के लोक आयपीएल बघायला स्टेडियममध्ये उपस्थित राहतात. बाकी सर्व चाहते टीव्ही किंवा मोबाइलवरून आयपीएल बघतात. त्यामुळेच कोरोनामुळे आयपीएल टाळल्यास प्रसारण करणाऱ्या कंपन्यांना मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच संघ मालकांनाही मोठा आर्थिक दणका बसेल. पाहा : VIDEO : मास्टर ब्लास्टरची खिलाडूवृत्ती, पंचांनी बाद देण्याआधी सचिनने सोडलं मैदान कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमियर लीग पुढे ढकलली गेली तर ते कधी होणार असा प्रश्न आहे. कारण आयपीएल खेळण्यासाठी टीम इंडिया व अन्य खेळाडूंकडे मे नंतर वेळ नसेल. आयपीएलनंतर लगेचच भारताला आशिया चषक, विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळाव्या लागतील, मग आयपीएलची तारीख कशी ठरविली जाईल? म्हणजे कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलली जाणार नाही तर सरळ रद्द होईल. आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच, आठही संघांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळं सौरव गांगुली आयपीएल व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. हे वाचा : इरफान पठाणने श्रीलंकन दिग्गजांच्या तोंडचा घास पळवला, इंडिया लिजंड्सचा दणदणीत विज भारतात होणाऱ्या आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगलाही ग्रहण लागले आहे. मात्र आता कोरोनामुळे टी -20 प्रीमिअर लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लीगमध्ये गेलसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. कोरोना विषाणूचा क्रिकेटला बसलेला हा दुसरा मोठा झटका आहे. आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी खेळाडू सहभागी असतात. मात्र आता खेळाडू आणि क्रिकेट बोर्डही खेळाडूंना इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी तयार नाही आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कोरोनाव्हायरस संबंधित चिंता व्यक्त केली आहे. न्यूझीलंड बोर्डाच्या म्हणण्यानुसार, आयपीएल दरम्यान ते आपल्या प्रत्येक खेळाडूला कोरोनाव्हायरस अपडेट देईल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह एकूण 6 खेळाडू आयपीएल 2020 खेळणार आहेत. हे वाचा : जागा एक दावेदार 2! रोहितच्या जागी आफ्रिकेविरद्ध विराट कोणाला देणार संधी? सध्या बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएल आणि कोरोनाव्हायरसच्या संबंधित कोणतेही मार्गदर्शक सूचना देश-विदेशातील खेळाडूंना देण्यात आलेले नाहीत. वास्तविक, आयपीएल दरम्यान सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने येतात अशा परिस्थितीत बीसीसीआय लवकरच खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी सल्ला आणि मार्गदर्शक सूचना जारी करू शकेल. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौर्‍यावर आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यापूर्वीही खेळाडूंना कोणाशीही हात मिळवू नये असे सांगितले आहे. हे वाचा : IPL 2020 : पाकमुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडूला दुखापत
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Uddhav thackeray

    पुढील बातम्या