मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : पाकमुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडूला दुखापत

IPL 2020 : पाकमुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडूला दुखापत

आयपीएल स्पर्धेला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल स्पर्धेला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल स्पर्धेला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

    मुंबई, 10 मार्च : जगभर कोरोना व्हायरसची दहशत पसरली असताना इंडियन प्रीमियर लीगवरही त्याचं सावट आहे. ही स्पर्धा होणार की नाही याची चिंता लागून राहिली असताना आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सला स्पर्धेआधीच मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडूला संपूर्ण स्पर्धेला मुकावं लागण्याची दाट शक्यता आहे. दुखापत झाल्यानं तो स्पर्धेतून माघार घेईल असं म्हटलं जात आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱा विंडीजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्यानं पाकिस्तान प्रिमीयर लीगमधून माघार घेतली आहे. पोलार्ड फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तरबेज आहे. त्यामुळे पोलार्ड जर खेळू शकला नाही तर मुंबईला अष्टपैलू खेळाडूची उणीव भासेल. पाकिस्तान प्रिमीयर लीगमधून माघार घेतलेल्या पोलार्डला आयपीएलमध्ये सहभागी होणं कठिण आहे. यासाठी दुखापतीमधून लवकर सावरण्याची गरज आहे. 29 मार्चला आयपीएलला सुरुवात होणार आहे. पोलार्ड खेळण्याची शक्यता कमी आहे. जर तो खेळला नाही तर मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, कोरोनामुळं सध्या साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. जवळ जवळ 80 देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. भारतातही तब्बल 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याचा फटका देशाची अर्थव्यवस्था त्याचबरोबर खेळांवरही होत आहे. त्यामुळे कोरोनामुळं भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग IPLला याचा फटका बसू शकतो. कोरोनामुळे IPL स्पर्धा रद्द होऊ शकते किंवा पुढे ढकलली जाऊ शकते. आता याबाबतचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे. हे वाचा : टीम इंडियालाही कोरोनाचा धोका? विराटसह सर्व खेळाडूंची होणार फिटनेस टेस्ट कोरोनामुळं आयपीएल सामने आयोजित करायचे की नाही, याबाबत 11 मार्चला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनामुळं आयपीएल स्पर्धा पुढे ठकलली जाऊ शकते. याआधी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे सांगितले. हे वाचा : धोनीसाठी IPL ही शेवटची संधी, टीम इंडियात परतण्यासाठी पूर्ण करावी लागेल ‘ही’ अट
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, IPL 2020

    पुढील बातम्या