मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जागा एक दावेदार 2! रोहितच्या जागी आफ्रिकेविरद्ध विराट कोणाला देणार संधी?

जागा एक दावेदार 2! रोहितच्या जागी आफ्रिकेविरद्ध विराट कोणाला देणार संधी?

रोहितच्या एका जागेसाठी 2 दावेदार, विराटसमोर सध्या सलामीला कोणाला उतरवायचे हा पेच आहे.

रोहितच्या एका जागेसाठी 2 दावेदार, विराटसमोर सध्या सलामीला कोणाला उतरवायचे हा पेच आहे.

रोहितच्या एका जागेसाठी 2 दावेदार, विराटसमोर सध्या सलामीला कोणाला उतरवायचे हा पेच आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई, 09 मार्च : न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 12 मार्चपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यासाठी रविवारी (09 मार्च) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात दुखापतीमुळे रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात रोहितला दुखापत झाली होती, त्यानंतर त्यानं कसोटीतूनही माघारी घेतली. रोहितच्या जागी संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी सलामीला फलंदाजी केली होती. मात्र त्यांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. एक सामना वगळता या दोघांनी चांगली भागीदारी केली नाही. मात्र आता आफ्रिकेविरुद्ध शिखर धवनने कमबॅक केल्यामुळं पुन्हा मयंकला डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळं आता विराटसमोर कोणाला सलामीला फलंदाजीला उतरवणार? हा सवाल आहे. आफ्रिकेविरुद्ध शिखर धवन आणि केएल राहुल सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकतात किंवा राहुलच्या जागी पृथ्वी शॉला संधी मिळू शकते. मात्र पृथ्वी शॉचा फॉर्म पाहता केएल राहुलला संघात जागा मिळण्याची शक्यता जास्त आहे. राहुल सलामीला आल्यास विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. याआधी न्यूझीलंड दौऱ्यात राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. त्यामुळं आफ्रिकेविरुद्ध शिखर धवनसोबत राहुलला संधी मिळण्याच्या शक्यता जास्त आहेत. वाचा-6 महिन्यांनंतर हार्दिकचा कमबॅक! पांड्यासाठी ‘या’ 2 खेळाडूचं करिअर संपवणार विराट शानदार फॉर्ममध्ये आहे राहुल केएल राहुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंड दौऱ्यात झालेल्या टी-20 आणि एकगदिवसीय मालिकेत त्यानं चांगली कामगिरी केली. एकदिवसीय मालिकेत केएलनं 102च्या सरासरीनं 3 सामन्यात 204 धावा केल्या, यात एका अर्धशतकाचा समावेश होता. तर, टी-20 मालिकेत राहुलला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यानं 5 सामन्यात 56च्या सरासरीनं 224 धावा केल्या, यात 2 अर्धशतकांचा समावेश होता. त्यामुळं आता विराट केएल राहुलला कोणत्या स्थानी उतरवणार हे पाहावे लागणार आहे. वाचा-पांड्या इज बॅक! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियातून 'या' खेळाडूंना वगळलं भारताचा एकदिवसीय क्रिकेट संघ - विराट कोहली, शिखर धवन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल. असा आहे भारत-दक्षिण आफ्रिका दौरा 12 मार्च- पहिला एकदिवसीय सामना (कोलकाता) 15 मार्च- दुसरा एकदिवसीय सामना (लखनऊ) 18 मार्च-तिसरा एकदिवसीय सामना (कोलकाता)
First published:

Tags: Cricket, Kl rahul, Prithvi Shaw

पुढील बातम्या