VIDEO : मास्टर ब्लास्टरची खिलाडूवृत्ती, पंचांनी बाद देण्याआधीच सचिनने सोडलं मैदान!

VIDEO : मास्टर ब्लास्टरची खिलाडूवृत्ती, पंचांनी बाद देण्याआधीच सचिनने सोडलं मैदान!

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खिलाडुवृत्तीचं दर्शन पुन्हा एकदा सर्वांना झालं. पंचांनी बाद देण्याआधीच सचिनने मैदान सोडलं.

  • Share this:

मुंबई, 11 मार्च : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजंड्स विरुद्ध श्रीलंका लिजंड्स यांच्यात सामना होत आहे. या मन्यात लंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीला लंकेनं लवकर बाद केलं. यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाला. चामिंडा वासच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कलुविथरानाकडे झेल देऊन बाद झाला. यावेळी सचिनने पुन्हा एकदा खिलाडुवृत्तीचं दर्शन दिलं. सचिन बाद झाला तेव्हा पंचांनीही आऊट देण्यासाठी बोट वर केलं नव्हतं. जणू त्यांना अजुनही सचिनला खेळताना बघायचं होतं. मात्र, तोपर्यंत सचिनने मैदान सोडलं होतं. सचिन गेला तरीही पंचांनी बोट वरती केलं नव्हतं.

सचिन बाद झाल्यानंतर सेहवागही धावबाद झाला. गेल्या सामन्यात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या सेहवागने 5 चेंडूत फक्त 3 धावा केल्या. त्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंग चामिंडा वासच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 4.2 षटकांत भारताची अवस्था 3 बाद 19 अशी झाली होती.युवराज बाद झाल्यानंतर संजय बांगर आणि मोहम्मद कैफ यांनी डाव सावरला. संजय बांगर रंगना हेराथच्या गोलंदाजीवर पायचित झाला. तर कैफला सेनानायकेनं 46 धावांवर बाद केलं. त्यानंतर इरफान पठाणने तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप नेलं. त्याला मनप्रीत गोनीने दुसऱ्या बाजुने साथ दिली. कैफ बाद झाला तेव्हा इंडिया लिजंड्सच्या 5 बाद 81 धावा झाल्या होत्या. त्यानंतर इरफान पठाणने 31 चेंडूत 57 धावा केल्या आणि इंंडिया लिजंड्सला दणदणीत विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या. लकेंकडून दिलशान, कलुविथराना, कपुदगेरा आणि सेनानायके यांनाच 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या. भारताच्या मुनाफ पटेलनं 4 गडी बाद केले तर झहीर खान, इरफान पठान, गोनी आणि संजय बांगर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हे वाचा : कोरोनामुळे IPL वर टांगती तलवार, मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

First published: March 11, 2020, 7:11 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading