मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20WC: 'रवी शास्त्री 24 तास नशेच्या धुंदीत असतात' केआरकेचा गंभीर आरोप

T20WC: 'रवी शास्त्री 24 तास नशेच्या धुंदीत असतात' केआरकेचा गंभीर आरोप

Ravi Shastri

Ravi Shastri

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियावर (Team India )सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक कामगिरी पाहता सर्व स्तरातून टीम इंडिया (Team India) आणि संघ व्यवस्थापनावर सडकून टीका होत आहेत. अशातच, अभिनेता कमाल राशिद खान म्हणजेच केआरकेने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Bollywood Actor Kamaal R Khan Aka Krk Slams Ravi Shastri) यांच्यावर निशाणासाधत शास्त्री 24 तास नशेच्या धुंदीत असतात असा गंभीर आरोप केला आहे.

केआरकेने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात झालेल्या पराभवाचे विश्लेषण करत कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक शास्त्रींना लक्ष्य केले आहे.

Team India वर भडकला वीरेंद्र सेहवाग, करुन दिली 2007 च्या वर्ल्ड कपची आठवण

“रवी शास्त्री २४ तास नशेच्या धुंदीत असतात. एखाद्या लहान मुलाने त्यांचा चेहरा पाहिला तर तो चार दिवस रडत राहील. जेव्हा विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात पहिलं षटक कोणाला द्यावे असे विचारले असेल तेव्हा नशेच्या धुंदीतच त्यांनी विराटला वरुन चक्रवर्तीला पहिले षटक टाकायला सांग असे सांगितले असेल,” असे केआरकेने म्हटले आहे.

" isDesktop="true" id="626338" >

तसेच केआरकेने वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या आयपीएलवरुनही टीम इंडियावर निशाणा साधला. टॉस हारल्यानंतर कोहली घाबरला त्याच्या भीतीचा काही ठाव ठिकाणा नव्हता. कोहलीने तेव्हाच मान्य केलं की आपण हा सामना १०० टक्के हरणार आहे.

रोहित शर्माच्या आधी ईशान किशनला सलामीला पाठवण्याचा निर्णयही चुकला. तो मुलगा कधी कधी आयपीएलमध्ये धावा करतो पण आंतरराष्ट्रीय सामने खेळणे आणि आयपीएल खेळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत,” असा टोला केआरकेने लगावला आहे.

नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसली पाकिस्तानची टीम, पाहा पुढे काय झालं? VIDEO

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघावर जोरदार टीका होत आहे.

First published:

Tags: Ravi shashtri, Ravi shastri, Rohit sharma, T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india, Virat kohli