मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक घुसली पाकिस्तानची टीम, पाहा पुढे काय झालं? VIDEO

T20 World Cup: नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक घुसली पाकिस्तानची टीम, पाहा पुढे काय झालं? VIDEO

नामिबियानं शेवटपर्यंत संघर्ष करत पाकिस्तानला  (Pakistan vs Namibia) चांगलंच झुंजवलं. त्यांनी बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांना सहज रन काढू दिले नाहीत. तर शाहीन आफ्रिदीच्या बॉलिंगची चांगलीच धुलाई केली

  • Published by:  News18 Desk

अबु धाबी, 3 नोव्हेंबर:  बाबर आझमच्या (Babr Azam) पाकिस्तान (Pakistan) टीमनं नामिबियाचा पराभव करत टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्ताननं ग्रुप 2 मध्ये सलग 4 विजय मिळवले असून ही टीम सध्या टॉपवर आहे. भारत आणि न्यूझीलंडचा पराभव केलेल्या पाकिस्तानच्या टीमकडून नामिबिया विरुद्ध मोठ्या विजयाची अपेक्षा होती. पण, तसं झालं नाही. नामिबियानं शेवटपर्यंत संघर्ष करत पाकिस्तानला चांगलंच झुंजवलं.

नामिबियानं बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांना सहज रन काढू दिले नाहीत. तर शाहीन आफ्रिदीच्या बॉलिंगची चांगलीच धुलाई केली. पाकिस्ताननं अखेर ही मॅच 45 रननं जिंकली. या मॅचनंतर पाकिस्तानच्या टीममधील काही खेळाडू थेट नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहचले.

नामिबियाचा खेळ पाहून पाकिस्तानचे खेळाडू चांगलेच थक्क झाले होते. पाकिस्तानच्या बॉलर्ससमोर क्रेग विलियम्‍स, डेविड विसे यांनी चांगली बॅटींग केली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी नामिबियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्यांचं चांगल्या खेळीबद्दल अभिनंदन केलं. तसंच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) अर्धशतकं केली. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाला दुसऱ्या ओव्हरमध्येच धक्का लागला. वॅन लिंगेन 4 रनवर आऊट झाला. हसन अलीने त्याला बोल्ड केलं. स्टीफन बार्डने 29 आणि क्रेग विलियम्सने 40 रन करत नामिबियाच्या आशा जिवंत ठेवल्या, पण दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. डेव्हिड वीजने नाबाद 43 रनची खेळी केली, पण त्यांची टीम अपयशी ठरली.

T20 World Cup: बाबर- रिझवाननं एकाच मॅचमध्ये बनवले अनेक रेकॉर्ड्स, विराट-रोहित पडले मागं

First published:

Tags: Pakistan, T20 world cup