मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Team India वर भडकला वीरेंद्र सेहवाग, करुन दिली 2007 च्या वर्ल्ड कपची आठवण

Team India वर भडकला वीरेंद्र सेहवाग, करुन दिली 2007 च्या वर्ल्ड कपची आठवण

team india

team india

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने रोहित शर्माला (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवल्याने अनेक दिग्गजांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. अशातच, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने रोहित शर्माला (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवल्याने अनेक दिग्गजांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, 2007 च्या वर्ल्डकपचा दाखला देत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (virender sehwag) रोहित शर्माला सलामीला न पाठवण्यावरुन विराट आणि संघ व्यवस्थापनावर सडकून टीका केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीने रोहित शर्माला ओपनिंग न करता नंबर 3 ला खेळायला पाठविले. सलामीची जबाबदारी केएल राहुल आणि इशान किशन यांच्यावर देण्यात आली होती. टीम इंडियाचा हा निर्णय पुरता फसला, यानंतर या निर्णयावर अनेक दिग्गजांनी टीकाही केली. रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याच्या या निर्णयावर टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी खुलासा केला आहे. टीमला वरच्या क्रमांकावर डावखुरा खेळाडू हवा होता, म्हणून इशान किशनला ओपनिंगला पाठवण्यात आल्याचं राठोड म्हणाले.

पण, सेहवागने आपले मत मांडत 2007 च्या वर्ल्डकपच्यावेळी काय चुका झाल्या हे सांगीले आणि सध्याच्या टीम इंडियाची कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सेहवाग म्हणाला, “2007 वर्ल्ड कपमध्ये आम्ही दोन चुका केल्या. प्रथम, जेव्हा आम्ही चांगला पाठलाग करत होतो आणि सलग 17 सामने जिंकले होते, पण जेव्हा विश्वचषक आला तेव्हा आमचे प्रशिक्षक म्हणाले की आम्हाला फलंदाजीचा सराव आवश्यक आहे. मी म्हणालो आम्हाला दोन सामने जिंकू द्या आणि त्यानंतर आम्हाला फलंदाजीचा सराव करण्यासाठी सहा सामने असतील, पण त्यांनी नाही म्हणून सांगितले.

दुसरी चूक म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही सलामीची जोडी चांगली कामगिरी करत होती, तेव्हा ती तोडण्याची काय गरज होती?. सचिनने मधल्या फळीत फलंदाजी केली तर मधली फळी आणखी भक्कम होईल आणि कंट्रोल राहिल, असे म्हटले गेले. राहुल द्रविड, युवराज सिंग आणि एमएस धोनीमुळे मधली फळी भक्कमच होती, तुम्हाला चौथ्याची गरज का पडली? सचिनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि काय झाले ते आपण सगळ्यांनी पाहिले.

जेव्हा संघ डावपेच बदलतो तेव्हा संघाकडून काय चुका होतात, हे ही अनेक वेळा दिसते. सेट असलेले गणित बदलण्याची गरज का भासावी?, असे एक ना अनेक सवाल उपस्थित करत सेहवागने टीम इंडियाची नेमकी काय चुक झाली हे सांगण्यचा प्रयत्न केला आहे.

First published:

Tags: Rohit sharma, T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india, Virat kohli, Virender sehwag