मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियातील धुसफुस चव्हाट्यावर; या दोघांनी BCCI कडे केली विराटची तक्रार!

टीम इंडियातील धुसफुस चव्हाट्यावर; या दोघांनी BCCI कडे केली विराटची तक्रार!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ( Virat Kohli) टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup ) टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय (Virat Kohli Resigns as T20 Captain)घेतला, यानंतरही टीममध्ये सुरु असलेल्या अनेक घडामोडी समोर येत आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली,29 सप्टेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ( Virat Kohli) टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup ) टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय (Virat Kohli Resigns as T20 Captain)घेतला, यानंतरही टीममध्ये सुरु असलेल्या अनेक घडामोडी समोर येत आहेत. दरम्यान विराट कोहलीची तक्रार बीबीसीआयकडे (BCCI)कोणी केली यांची नावे समोर आली आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (WTC Final) न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी विराट कोहलीविरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरूवात केली होती. एका इंग्रजी वृत्तानुसार, भारतीय टीममधील दोन वरिष्ठ खेळाडूंनी बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांच्याकडे विराट कोहलीच्या वर्तनाबद्दल तक्रार केली होती. या अहवालात विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना फटकारल्याचाही उल्लेख आहे.

हे वाचा- IPL 2021: स्पर्धेतून बाहेर पडल्यावर कुलदीप यादवने दिली ही बातमी! कधी करणार कमबॅक

रहाणे आणि पुजारा यांनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रुममधील वर्तनाबद्दल जय शाह यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विराटच्या कर्णधारपदाबद्दलही चर्चा केली. त्यानंतर बीसीसीआयमध्ये हालचाली सुरू झाल्या असल्याचेही वृत्तामध्ये म्हटले आहे.

ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय घडलं होतं?

WTC फायनलमध्ये बॅट्समनच्या अपयशानंतर विराट कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये पुजारा आणि रहाणे या दोघांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. विराटने पुजाराच्या संथ स्ट्राइक रेटवर प्रश्न उपस्थित केले आणि रहाणेच्या खराब फॉर्मवर निशाणा साधला होता.

हे वाचा- विराटनंतर T20 World Cup साठी आपणच कर्णधार; रोहित शर्माने दिले संकेत

तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवत असल्याने बॅटिंगवर फारसे लक्ष देता येत नसल्याचे विराटने सांगितले. त्यामुळेच टी-२०चे कर्णधारपद सोडत असल्याचे विराटने जाहीर केले. मात्र, यामागे इंग्लंडमध्ये झालेल्या तक्रारीचा हात असल्याचे समोर येत आहे.

आगामी टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीनं टीम इंडियाच्या टी-20 चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. विराटच्या या कृतीने बीसीसीआय प्रचंड नाराज झाली आहे आणि भविष्यात त्याच्याकडून वन डे टीमचे नेतृत्वही काढून घेण्याच्या तयारीत आहेत. अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

First published:
top videos

    Tags: Ajinkya rahane, Pujara, Team india, Virat kohli