नवी दिल्ली,29 सप्टेंबर : आयपीएलमध्ये (IPL 2021) धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवने (Kuldeep Yadav surgery) आपल्यावर झालेली शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असल्याची पोस्ट शेअर करत आपल्या सहकाऱ्यांना खुशखबर दिली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सच्या कुलदीप यादवला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर, कुलदीपर वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यात आली असून आपली शस्त्रक्रिया यशस्वी (Kuldeep Yadav undergoes successful knee surgery )झाल्याचे कुलदीपने म्हटले आहे. तसेच, मी लवकरच मैदानात परत येईन, असा विश्वासही कुलदीपने व्यक्त केला आहे.
कुलदीप सराव करत असताना गंभीर दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्यानेच त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रीया करण्यासाठी कुलदीपला आयपीएल सोडवे लागले, तो मुंबईत दाखल झाला. त्यानंतर क्रिकेट वर्तुळात कुलदीप मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटमधून लांब राहणार असल्याची चर्चा रंगली.
IPL 2021: यंदा आयपीएलमध्ये पहिल्यांदा होतेय ही गोष्ट, 8 ऑक्टोबरला घडणार इतिहास
मात्र, कुलदीपने ट्विटवरुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ''माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मैदानात परतण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल आपले आभार.
Surgery was a success and the road to recovery has just begun. Thank you so much to everyone for your amazing support. The focus is now to complete my rehab well and be back on the pitch doing what I love as soon as possible. ♥️🙏🏻 pic.twitter.com/364k9WWDb3
— Kuldeep yadav (@imkuldeep18) September 29, 2021
सध्या माझ्या प्रकृतीवर आणि लवकरात लवकर मैदानात परतण्यावरच माझा फोकस आहे, असे कुलदीपने ट्विटरवरुन म्हटले आहे. तसेच, त्याने रुग्णालयातील फोटोही शेअर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021, Kuldeep yadav, Surgery