मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराटनंतर T20 World Cup साठी आपणच कर्णधार; रोहित शर्माने दिले संकेत

विराटनंतर T20 World Cup साठी आपणच कर्णधार; रोहित शर्माने दिले संकेत

विराटनंतर टी-20 विश्वचषकसाठी आपणच कर्णधार. रोहित शर्माने पोस्ट शेअर दिले संकेत

विराटनंतर टी-20 विश्वचषकसाठी आपणच कर्णधार. रोहित शर्माने पोस्ट शेअर दिले संकेत

ट्वेन्टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेचा इतिहास पुन्हा घडवायचा आहे आणि यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे...." अशा आशयाची कॅप्शन Rohit Sharma ने T20 विश्वचषक संघासाठी आपणच कर्णधार बनणार असल्याचे संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली,29 सप्टेंबर : नुकतंच महान क्रिकेटपटूंपैकी एक सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारताला पुढील वर्षी टी-20 विश्वचषकही (T20 World Cup)खेळायचा आहे. त्यामुळे मला वाटतं रोहित शर्माला (Rohit Sharma)पुढील दोन टी-20 विश्वचषकांसाठी भारताचा कर्णधार बनवने योग्य ठरेल. असे मत व्यक्त केले. दरम्यान, संघाचा हिटमॅन रोहित शर्माची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्याची ती पोस्ट पाहता गावस्करांनी पाहिलेलं स्वप्न लवकर पूर्ण (India's captain for this T20 World Cup and also the next one)अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

भारतीय युवा संघानं 2007 साली T20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद पटकावले होते. रोहित शर्मा त्या संघाचा सदस्य होता. रोहितनं बुधवारी 2007 सालच्या विश्वविजयाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ट्वेन्टी-20  वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पुन्हा घडवायचा आहे आणि यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे. आम्ही येतोय. हा चषक आमचा आहे. चला आपण करुन दाखवूया", अशी प्रेरणादायी कॅप्शन रोहित शर्माने लिहिली आहे.

हे वाचा: रोहित Team India चा कर्णधार, हे दोघे उपकर्णधार; दिग्गज क्रिकेटपट्टूचा सल्ला

तत्पूर्वी, स्टार स्पोर्ट्सच्या शो 'क्रिकेट कनेक्टेड' मध्ये गावस्कर यांनी ''रोहित शर्माला पुढील दोन टी-20 विश्वचषकांसाठी भारताचा कर्णधार बनवने योग्य ठरेल. असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर रोहितची टी-20 विश्वचषकांसाठी असलेली उत्सुकता पाहता गावस्करांनी पाहिलेलं स्वप्न लवकर पूर्ण होणार या चर्चेने जोर धरला आहे.

रोहितने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

२४ सप्टेंबर २००७ जोहान्सर्बग. हाच तो दिवस जेव्हा कोट्यवधी लोकांची स्वप्न पूर्ण झाली. एक युवा संघ इतिहास घडवले असा विचार कुणी केला होता? १४ वर्ष झाली या अनमोल घटनेला. आता आपण खूप पुढे आलो आहोत. त्यानंतरही अनेक ऐतिहासिक विजय प्राप्त केले.

काही धक्के देखील मिळाले पण आजही हिंमत हरलेलो नाही. कारण आम्ही कधीही हार पत्करणारे नाही. आम्ही जीवाचं रान करू!! ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पुन्हा घडवायचा आहे आणि यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे. आम्ही येतोय. हा चषक आमचा आहे. चला आपण करुन दाखवूया"अशा आशयाची कॅप्शन देत त्याने टी-20 विश्वचषक संघासाठी आपणच कर्णधार बननार असल्याचे संकेत दिले आहेत.

रोहित शर्माच विराटला सक्षम पर्याय

विराट कोहलीने टी-20 मध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे कर्णधारपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर रोहित शर्माचे नाव आहे. यापूर्वीदेखील रोहितला टी-20 कर्णधारपद देण्यात यावे, असे अनेक विशेषज्ञाने सांगितले होते. आकड्यांमध्येदेखील रोहित विराटपेक्षा सरस आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये रोहितची विजयी टक्केवारी 78.94 अशी आहे.आयपीएलच्या 2013 च्या सत्रात मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या मध्येच रिकी पाँटिंगकडून कर्णधारपद काढून रोहित शर्माला दिले आणि रोहितने संघाला पहिल्यांदा आयपीएल जेतेपद मिळवून दिले. यानंतर रोहितने कधीही मागे वळून पाहिले नाही. रोहितने आजवर 5 आयपीएल जेतेपद मिळवले आहे. रोहितने मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 ला जेतेपद मिळवून दिले होते.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Rohit sharma, T20 world cup, Virat kohli