जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / यंदाचा श्रावण आहे फार कष्टाचा! 'या' राशीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी

यंदाचा श्रावण आहे फार कष्टाचा! 'या' राशीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी

...आपलीही प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरीराची आणि मनाची काळजी घ्या.

...आपलीही प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरीराची आणि मनाची काळजी घ्या.

काही राशीच्या व्यक्तींसाठी यंदाचा श्रावण महिना शुभ, तर काहींसाठी अशुभ असणार आहे. अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात…

  • -MIN READ Local18 Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
  • Last Updated :

सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 4 जुलै : यंदाच्या श्रावणात अधिक मासामुळे चार किंवा पाच नाही, तर आठ सोमवार असणार आहेत. त्यानुसार, 18 जुलैला सुरू होणारा श्रावण 14 सप्टेंबरला संपेल. तर, उत्तर भारतात श्रावण महिना आपल्या आधी सुरू होतो. त्यामुळे तिथे आज सुरू झालेला श्रावण 31 ऑगस्ट 2023 रोजी संपेल. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या व्यक्तींसाठी यंदाचा श्रावण महिना शुभ, तर काहींसाठी अशुभ असणार आहे. अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात, अनेक राशीच्या वक्तींना श्रावणात कष्ट सोसावे लागतील. ज्यात मकर, तूळ, वृषभ आणि कुंभ राशींचा समावेश आहे. जाणून घेऊया सविस्तरपणे, पंडितजींनी नेमकं सांगितलंय काय…

News18लोकमत
News18लोकमत

मकर: या राशीच्या व्यक्तींसाठी यंदाचा श्रावण अनेक अडचणी घेऊन येणार आहे. आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक अतिशय विचारपूर्वक करा. शिवाय खर्चावरही नियंत्रण ठेवा. तूळ: या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात यंदाचा श्रावण काही खास घेऊन येणार नाही. उलट आपल्याला आर्थिक अडचणी सोसाव्या लागतील, प्रकृतीसंबंधी तक्रारी उद्भवली. त्यामुळे जास्त धावपळ करू नये. प्रकृती जपावी, कुटुंबीयांची काळजी घ्यावी. Pawar Family : ‘पवार कुटुंबीय आतून एकच ते फुटणार नाहीत..’; पवारांच्या वर्गमित्राला अजूनही विश्वास, म्हणाले.. वृषभ: या राशीच्या व्यक्तींचा ताण श्रावणात आणखी वाढणार आहे. शिवाय आपण आजारी पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शरीराची आणि मनाची काळजी घ्या. कुंभ: या राशीच्या व्यक्तींनाही श्रावणात काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण आपली प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. शिवाय करियरबाबत चढ-उतार पाहायला मिळेल. आपण श्रावणात बाहेर जाणं टाळलं आणि घरूनच काम करण्यास प्राधान्य दिलंत, तर आपली अनेक संकटं दूर होतील. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात