Home » Tag » Shravan

shravan बातम्या - Shravan News

    श्रावण महिना म्हणजे सगळ्या ऋतूंचा राजा मानतात. आषाढसरी कमी झालेल्या असतात आणि छान ऊन-पावसाचा खेळ सुरू झालेला असतो. अवघी सृष्टी पाचूसारखी हिरवी भासते या महिन्यात. आल्हाददायी ऋतू आणि त्यात सणवारांची रेलचेल, त्यामुळे आबालवृद्धांना हा महिना हवाहवासा वाटतो. पारंपरिक सणासुदीला श्रावणापासूनच सुरुवात होते. स्त्रियांसाठी हा महिना म्हणजे आनंदसोहळाच. सोमवारचा उपवास, मंगळागौरीचे खेळ, शुक्रवारचं हळदीकुंकू अशा अनेक प्रथा-परंपरा आजही पाळल्या जातात. त्यामध्ये भेटी-गाठी, खेळ आणि उत्साह हाच आजचा उद्देश असावा.

    श्रावणात माहेरपणाला महत्त्व आहे. माहेरची ओढ आणि श्रावण बरोबरीनेच येतात. त्यामुळे स्त्रीवर्गाला सुखावणारा, विरंगुळा देणारा हा व्रत-वैकल्यांचा महिना सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. पुरणपोळी, सांदण, चणे-फुटाणे असे चोचलेही श्रावण पुरवतो तसं एकत्र येण्याचं निमित्तही देतो.