कोल्हापूर, 25 जानेवारी : कोल्हापुरात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली मंदिरं आहेत. शहरात येणारे पर्यटक या धार्मिक स्थळांना नक्की भेट देतात. कोल्हापुरातील प्रमुख मंदिरांमध्ये रंकाळा तलावा शेजारच्या जाऊळाचे बालगणेश मंदिराचा समावेश होतो. रंकाळा तलाव पाहायला आलेले पर्यटक या ठिकाणाहूनच पुढे जातात. गणेश जयंती निमित्त आपण या मंदिराचे वैशिष्ट्य पाहूया एकमेव मूर्ती कोल्हापूर शहरात रंकाळा टॉवर चौकात जाऊळाचा बाल गणेश मंदिर आहे. रंकाळा टॉवर येथील पदपथावरुन जरी पाहिले तरी हे गणपतीचे दुमजली मंदिर आपल्या नजरेस पडते. खरंतर हे मंदिर आत्ताच्या काळातीलच आहे. पण अशी बालगणेशाची ही एकमेव मूर्ती असल्यामुळे या मंदिराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. खाली मंदिर आणि वरच्या मजल्यावर एक छोटा हॉल असे या मंदिराचे बांधकाम आहे. रंकाळ्याच्या काठावर पूर्वी संपूर्ण शेतवड होती. इथून पुढे अनुकामिनी देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट होती. इथे या बालगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एका छोटी देवळीमध्ये करण्यात आली होती. त्याच्या बाजूला मोठा पार बांधला होता. त्यानंतर परिसरातील तरुण मंडळींनी पुढे इथे मंदिर बांधायला सुरुवात केली होती. वसंतराव निगडे हे नगराध्यक्ष असताना या देवळाची उभारणी करण्यात आली. पुढे हळूहळू मंदिर हे वाढवण्यात आले. गणेश जयंतीला घ्या पुण्यातील 5 गणपती मंदिरात दर्शन, तुमचा दिवस जाईल शुभ बालगणेशाचे मंदिर म्हणून हे सुरूवातीला प्रचलित होते. पण मंदिरातील मूर्तीला जावळ आणि खाली लिंग देखील असल्यामुळे या मंदिराची ख्याती जाऊळाचा बालगणेश मंदिर अशी पसरत गेली, अशी माहिती येथील सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सदशिव लगारे यांनी दिली आहे. या ठिकाणी पूर्वी लोक आपल्या बाळाचे जावळ काढायला यायचे. या बालगणेशाच्या पायांवर लहान मुलांना झोपवण्याची प्रथा आजही इथे कायम आहे. रंकाळ्यावर पोहायला येणारी मंडळी तिथून पाणी आणून देवाला अर्पण करून पुढे जायचे, असे देखील लगारे यांनी सांगितले. सध्या मंदिर नित्यपूजा करण्यासाठी नारायण साळोखे हे पुजारी आहेत. या मंदिरातील सर्व मुर्तींना सकाळी अभिषेक आणि नंतर आरती अशी रोजची सेवा ते करतात, असेही लगारेंनी स्पष्ट केले.
कसे आहे मंदिर ? बालगणेशाचे सध्या दुमजली मंदिर हे आहे. मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूला हत्तींच्या मुर्ती आहेत. आत मंदिरात मध्यभागी चौथऱ्यावर मुख्य बालगणेशाची दगडी मूर्ती आहे. केशरी रंगाच्या या सुंदर मुर्तीच्या डोक्यावर लहान मुलांप्रमाणे जावळ आहे. चौथऱ्याच्या बाजूने लोखंडी गज लावण्यात आले आहे. आतमध्ये समोर गणेशमुर्तीच्या उजव्या बाजूला मारुतीची आणि डाव्या बाजूला दत्ताची मूर्ती दगडात कोरलेली आहे. त्यांच्यासमोर एक शंकराची पिंड आहेत. चौथऱ्याच्या बाहेर एका बाजूला शनी देवाची दगडी मूर्ती आणि समोर एक कासव देखील आहे.
750 वर्ष प्राचीन मंदिर, मूर्तींवर हात फिरवला की होतो चमत्कार! Video
मुख्य रस्त्यावरच्या कोपऱ्यावर हे मंदिर असल्यामुळे जाता येता बरेचजण देवाला नमस्कार करत असतात. तर प्रत्येक मंगळवारी, संकष्टीच्या दिवशी आणि सणासुदीच्या दिवशी या ठिकाणी भाविकांची रीघ लागलेली असते.
गुगल मॅपवरून साभार
कुठं आहे मंदिर? जाऊळाचा बाल गणेश मंदिर रंकाळा टॉवर चौक, कोल्हापूर-गगनबावडा रोड, कोल्हापूर - ४१६०१२