सोलापूर, 24 जानेवारी : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे हेमाडपंथीय वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारे शिवकालीन अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे. वेळापूर हे ठिकाण देवगिरीच्या यादवांच्या काळात भरभराटीस आले होते. हे ठिकाण देवगिरीची दक्षिण सीमा आहे. त्या काळी हे ठिकाण पर्यटनस्थळ आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात होते.
कधी झाली मंदिराची स्थापना?
शिलालेखात दिलेल्या माहिती नुसार इ.स. (1271 ते 1310) या ठिकाणच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे आढळून येते. या मंदिराचा जीर्णोद्धार बाईदेवराणा यांनी केला असा उल्लेख येथील शिलालेखात आढळतो. मराठी आणि संस्कृत भाषेत असणाऱ्या या शिलालेखांत देवराणा यांच्या नावाचा उल्लेख आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आत आणि बाहेर दोन नंदी आहेत.
Solapur : सोलापूरची ओळख असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास माहिती आहे का? Video
मंदिराच्या सभोवताली काय आहे?
मंदिरासमोरच पाण्याचे एक मोठे कुंड आहे. बाराही महिने यामध्ये पाणी असते. डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे. यामध्येच उजव्या बाजूला असणाऱ्या पाच-सहा मंदिरांमध्ये नागदेवता, गणेश यांच्या मूर्ती आहेत, तर डाव्या बाजूला एक छोटेसे मंदिर असून त्यामध्ये एक पिंड आहे. मंदिरातील बहुतांशी मूर्ती पुरातत्त्व खात्याने बांधलेल्या संग्रहालयात आहेत. संग्रहालयातील काही मूर्तींवर हात फिरवला - अथवा - टिचकी मारल्यास सप्तसूर निघतात.
मुख्य दरवाजासमोरच एक नंदीची मोठी मूर्ती आहे. गाभाऱ्यातील दरवाजावर गजलक्ष्मी कोरलेली आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर भग्नावस्थेत अजूनही उभे आहे. आसपासच्या अनेक मंदिरात वेगवेगळ्या आकाराच्या अनेक पिंडी आहेत. मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी असून तत्कालीन कलेचा एक अद्वितीय नमुना म्हणता येईल. पांढऱ्याशुभ्र वस्त्रात असणारी ही मूर्ती असून मूर्तीच्या वरील भागात - गोलाकार - सप्तऋषींच्या प्रतिमा कोरलेल्या असून मध्यभागी कीर्तिमुख आहे. पार्वतीच्या पायावर एक चक्र आहे तर पायाच्या बाजूला गणपती, एक पुरातन ऋषी यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
Amravati : तब्बल 500 किलोची घंटा ठेवण्यासाठी बांधलं चक्क नवं मंदिर, पाहा Video
कधी असते यात्रा ?
अर्धनारी नटेश्वर ग्रामदैवताची यात्रा चैत्र पौर्णिमेस होते. शुद्ध पंचमीस हळदी, अष्टमीस लग्न व पौर्णिमेस वरात आणि वद्य अष्टमीस सोळावी असा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या कालावधीत विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. यादवकालीन या मंदिरामुळे वेळापूरला अनन्य साधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. यात्रा म्हणजे देवाचे लग्न आणि हळदी समारंभ असतो, असे मंदिराचे पुजारी गुरव यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार
कुठे आहे मंदिर?
वेळापूर, ता. माळशिरस जि. सोलापूर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Famous temples, Local18, Solapur