Home /News /pune /

अजित दादा, आपण उगाच वेगळे राहिलो, आधीच एकत्र यायला हवं होतं - उद्धव ठाकरे

अजित दादा, आपण उगाच वेगळे राहिलो, आधीच एकत्र यायला हवं होतं - उद्धव ठाकरे

'लोकांना रयतेचे राज्य आलं असं वाटतं. आपला माणूस मुख्यमंत्री झाला अशी लोकभावना आहे.'

  पुणे19 फेब्रुवारी : शिवेनेरीवर शिवजयंतीचा कार्यक्रम आज साजरा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा किल्ले शिवनेरीवर झाला. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीच्या कामावर भाष्य केलं. यावेळी एका स्थानिक कार्यकर्त्याने शिवस्मारकाबाबत त्यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, आम्ही आता सगळी कामं करणार आहोत. अजित दादा आपण आत्तापर्यंत उगाच वेगळे राहिलो. आधीच एकत्र यायला पाहिजे होतं. सरकारे आली आणि गेलीत. मात्र हे सरकार टिकेल. काही जणांच्या पोटात दुखतंय.  हे सरकार लोकांना आपलं वाटतंय. मघाशी आम्ही बसलो होतो कार्यक्रम बघत, एक कार्यकर्ता म्हटला दादांना सांभाळा. काळजी करू नका. दादा एवढी वर्षे उगीच वाया घालवली. यापुढेही एकत्र राहू आणि काम करू. शिवप्रभूंना अपेक्षीत असलेलं राज्य आणू. तर अजित पवारांनीही आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. अजित पवार म्हणाले, शिव जन्मोत्सवाला नेहमी येत असतो. पण एवढी गर्दी प्रथमच पाहिली. लोकांना रयतेचे राज्य आलं असं वाटतं. आपला माणूस मुख्यमंत्री झाला अशी लोकभावना आहे. मराठा आरक्षण आंदोलनात नियमाच्या अधीन राहून कायद्याच्या चौकटीत राहून शासकीय मालमत्तेचे नुकसान केलं नाही असे गुन्हे मागे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  दिल्लीच्या तख्तावर शिवजयंती, 12 देशांच्या दूतांनी केला राजांना मानाचा मुजरा

  मतभेदांवर काय म्हणाले अजित पवार? 'एल्गार' परिषदेच्या चौकशीवरून सध्या महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी SITच्या माध्यमातूनच करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावून धरली होती. NIAने या प्रकरणाची चौकशी करण्याला त्यांचा ठाम विरोध होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी NIAचौकशीला मंजूरी दिल्याने महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही असं स्पष्ट झालं होतं. नंतर शरद पवारांनीही काही पत्रकार परिषदांमध्ये यावर नाराजी व्यक्त केली. मात्र चौकशीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावर खुलासा केलाय.

  औरंगाबाद पालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा बसणार, 7 नगरसेवक बांधणार शिवबंधन

  त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झालेत का? अशी चर्चा केली जाऊ लागली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. CAA/NRC/NPRलाही राष्ट्रवादीने तीव्र विरोध केलाय. तर उद्धव ठाकरे यांनी NRCला विरोध असल्याचं सांगत CAA/NPRला मात्र विरोध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. EXCLUSIVE कसाबला मारण्याचा दाऊदचा प्लान? छोटा शकीलचा पहिल्यांदाच खळबळजनक खुलासा या सगळ्या मतभेदांच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केलाय. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवनेरीवर एकत्र आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. सगळे प्रश्न आम्ही समन्वयाने सोडवू. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते. मात्र आम्ही पहिले आमच्या किमान समान कार्यक्रमाला बांधील आहोत.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Ajit pawar, Uddhav tahckeray

  पुढील बातम्या