छत्रपती शिवाजी महाराज यांची वैश्विक जयंती आज राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरी झाली. या जयंती कार्यक्रमात बारा देशांचे राजदूत सहभागी झाले. या राजदूतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले. तर बल्गेरियाच्या राजदूत इलेन वोरा यांनी मराठीत भाषण करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महाराष्ट्र सदनामध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्र सदन हे हे फुलांनी सजविण्यात आले होते. सोबतच नाशिकचे ढोल पथक आणि लेझीम पथकाने जयंती कार्यक्रमात रंगत आली. लष्काराच्या मराठा रेजिमेंटचा बँड महाराष्ट्र सदनात वाजवण्यात आला. शिवजन्माच्या सोहळ्यासाठी शिवाजी महाराजांचा पाळणा देखील सजविण्यात आला होता. छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.