Home /News /maharashtra /

औरंगाबाद पालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा बसणार, 7 नगरसेवक बांधणार शिवबंधन

औरंगाबाद पालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा बसणार, 7 नगरसेवक बांधणार शिवबंधन

तनवाणी आणि हे सर्व समर्थ नगरसेवकांसह मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे.

    औरंगाबाद 19 फेब्रुवारी : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राजकीय क्षेत्रातही अनेक बदल व्हायला सुरुवात झालीय. औरंगाबाद महापालिकेची निवडणुक तोंडावर आली असतानाच भाजपचे माजी शरहाध्यक्ष किशनचंद तनवाणी हे समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपच्या शहराध्यक्ष निवडीवरून ते काही दिवसांपासून नाराज होते. मुळचे शिवसैनिक असलेले तनवाणी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्याला डावललं जातंय असं वाटल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्यासोबत 6 ते 7 समर्थक नगरसेवकही शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तनवाणी आणि हे सर्व समर्थ नगरसेवकांसह मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. औरंगाबाद महापालिकेत गेली अनेक वर्ष शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खौरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले. इंदोरीकर महाराजांबद्दल पहिल्यांदाच बोलले रोहित पवार, म्हणाले... त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबदमध्ये शिवसेनेची ताकद कमी झाली असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना वेगळी झाल्याने महापालिका निवडणुकीत कुठलाही फटका बसू नये याची काळजी शिवसेना घेत आहे. 'त्या रात्री अजमल कसाब जिवंत पकडला गेला नसता तर...' निवडणुकीआधीच आपली ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेने नाराज तनवाणींना आपल्याकडे वळवलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने त्याचा फायदा शिवसेनाला झाला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Aaurangabad, BJP, Bjp-shivsena

    पुढील बातम्या